वीज पुरवठा खंडित झाल्याने लातूरचा पाणी पुरवठा बंद

Latur News
Latur News

लातूर ः लातूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या धनेगाव धरणावरील जॅकवेलचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. सोमवारी (ता.११) रात्रीपर्यंत महावितरणकडून वीजपुरवठा सुरु झालेला नव्हता. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरच शहराला पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे दहा दिवसांतून एकदा पाणी देण्याचे वेळापत्रक आता विस्कळीत झाले आहे.


लातूरला धनेगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून मुरुडहून सरळ धरणापर्यंत एक्सप्रेस फिडर देण्यात आले आहे. पण या फिडरच्या लाईनमध्ये रविवारी (ता.दहा) रात्रीपासून बिघाड झाला आहे. त्यामुळे धरणावरील जॅकवेलचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच या दिवशी हरंगुळच्या जलशुद्धीकरण केंद्राचाही वीज पुरवठा खंडीत झाला आहे. सोमवारी रात्रीपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नाही . विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्नशील असून विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय चोळखणे यांनी दिली.


रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल भाजपची नाराजी
लातूर शहराअंतर्गत मुख्य रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत होणारे कामाच्या गुणवत्तेबद्दल भारतीय जनता पक्षाने नाराजी व्यक्ती केली आहे. हे काम गुणवत्तेचा दर्जा कायम ठेवून केले जावे, अशी मागणी केली आहे; तसेच कामाची गुणवत्ता राखली जात नसल्याबद्दल पक्षाच्या नगरसेवकांनी सोमवारी (ता. ११) गांधीगिरी करून या रस्त्याचे प्रतीकात्मक उद्‍घाटनही केले.
शहरातील पीव्हीआर चौकापासून गंजगोलाईमार्गे गरुड चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग योजनेतून केले जात आहे. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात सभागृहनेते शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक देवा साळुंके यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com