नांदेड : सासरच्या मंडळींकडून सुनेला जाळून मारण्याचा प्रयत्न

नांदेड : सासरच्या मंडळींकडून सुनेला जाळून मारण्याचा प्रयत्न

नांदेड : एका विवाहितेचा छळ करून तिला जीवंत जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार शेळगाव छत्री (ता. नायगाव) येथे शुक्रवारी (ता. १९) घडला. भाजलेल्या विवाहितेवर शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरू आहे. 

नायगाव तालुक्यातील शेळगाव छत्री येथे राहणाऱ्या कोमल पीराजी कुंभारगावे (वय २०) हिला सासरी नाहक त्रास देणे सुरू केले. लग्नानंतर तिच्यासोबत पती पीराजी कुंभारगावे हा चांगला राहू लागला. परंतु नंतरच्या काळात आई- वडिलांच्या मह्णण्यानुसार तो आपल्या पत्नीला त्रास देऊन मारहाण करीत असे. तसेच सकाळी तु लवकर उठत नाहीस, घरकाम करता येत नाही, असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते.

शिवीगाळ करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने आरडा- ओरडा केल्याने शेजारी धावून आले. जळालेल्या अवस्थेत तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. ती सध्या उपचार घेत आहे. तिच्या जबानीवरून कुंटूर पोलिस ठाण्यात पती पीराजी माधव कुंभारगावे, सासरा माधव पीराजी कुंभारगावे आणि सासू सागरबाई माधव कुंभारगावे या तिघांवर विवाहितेचा छळ, ठार मारण्याचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मरे हे करीत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्‍वर धुमाळ यांनीही भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com