लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता निविदेला अखेर मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

जालना रोडला समांतर - साठ फुटांच्या रस्त्यासाठी १३ कोटी ६७ लाखांची निविदा 

औरंगाबाद - जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी होण्यासाठी या रोडला समांतर असलेला लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याच्या कामाच्या निविदेसाठी तारीख पे तारीख पडत होती. अखेर या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) ई-निविदा काढण्यात आली. १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३५ रुपयांच्या कामाची निविदा उघडण्यासाठी सोमवारी (ता. २९) प्री-बीड मीटिंग होणार आहे. 

जालना रोडवर वर्दळ वाढल्याने सतत छोटे-मोठे अपघात होतात. यामुळे लक्ष्मण चावडी ते एमजीएम हा रस्ता जालना रोडला पर्याय बनणार आहे. एमजीएम ते थेट वरद गणेश मंदिर चौक असा जालना रोडसाठी पर्यायी मार्ग सुरू होणार आहे. चार महिन्यांपूर्वी क्रांती चौक ते बाबा पेट्रोलपंप रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असल्याने त्याऐवजी लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याचे काम शासनाकडून प्राप्त २४ कोटींच्या निधीतून करण्याचा निर्णय एका बैठकीतून घेण्यात आला. महापौरांसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही तारखेवर तारखा दिल्या जात होत्या. अखेर या निविदा प्रक्रियेला मंगळवारी (ता.१६) मुहूर्त लागला आणि निविदा प्रसिद्ध झाली.

रस्ता मंजूर होऊन बरीच वर्षे झाली. या कामासाठी नागरिकांनी आपल्या घराच्या जागा दिल्या; परंतु निविदा प्रक्रियाच सुरू होत नव्हती. निविदा प्रक्रिया लवकर व्हावी व प्रत्यक्ष कामाला सुरवात व्हावी, यासाठी आपण सतत पाठपुरावा केला, यामुळे उशिरा का होईना निविदा निघाली याचा आनंद आहे.
- आशा भालेराव, वॉर्डाच्या नगरसेविका

फटाके फोडून जल्लोष
या रस्त्याची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर स्मशान मारुती मंदिर येथे फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. या वेळी महापौर भगवान घडामोडे, भाजपचे आमदार अतुल सावे, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, नगरसेवक राखी देसरडा, कैलास गायकवाड, शिवाजी दांडगे, रमेश जायभाय, परिसरातील नागरिक सखाराम पोळ, राजू वाडेकर, वल्लभ बागला, संदीप वाघ, फय्याज सेठ, अशोक जगताप, राजू राठी, दिलीप सोनी, पंजाबराव वडजे आदी उपस्थित होते.
 
हा रस्ता पूर्ण व्हावा, यासाठी आपण गेल्या वीस वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. यामुळे जालना रोडला पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडामोडे यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केले.
- प्रशांत देसरडा, माजी उपमहापौर

Web Title: laxman chavadi to mgm road tender muhurt