Aurangabad
Aurangabad

कर्जाचा उचलला भार; उघडले अभ्यासिकेचे द्वार

औरंगाबाद : गावकडच्या पोरांनी देखील शहरात येऊन आम्हीही मागे नाहीत, हे दाखवून द्यावे, त्यांनाही विविध क्षेत्रांत संधी मिळावी, यासाठी त्यांना अभ्यासासाठी सोय उपलब्ध करून देण्याचे काम लक्ष्मण नवले या तरुणाने सुरू केले आहे. सध्या सर्वत्र कमर्शियल अभ्यासिकेचे पेव फुटले असताना दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील; पण होतकरू मुलांना मदत व्हायलाच हवी, या भावनेतून त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन हा प्रयोग चालविला आहे. 

बेरोजगारी वाढल्याने पदवी, पदव्युत्तर झालेला प्रत्येकजण नोकरीचा शोध घेत आहे. नोकरी नाहीच मिळाली तर काय-काय व्यवसाय करता येतील, याचीही चाचपणी करतोय. मात्र, कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा असायला हवा. एकीकडे असे निराशादायी चित्र असतानाच दुसरीकडे खालापुरीसारख्या (ता. घनसावंगी, जि. जालना) गावातून शहरात येत लक्ष्मण नवले यांनी विधायक उपक्रम सुरू केला आहे. हिंदी, मानसशास्त्र या विषयांत पदव्युत्तर, त्यानंतर बी.एड. झालेल्या या युवकाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे कर्ज घेत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचा वेगळा मार्ग, व्यवसाय निवडला.

औरंगपुरा येथे वातानुकूलित "ध्यास' नावाने सुरू केलेल्या या अभ्यासिकेत सध्या 15 मुली, 55 मुले अभ्यासाला असतात. इतरांच्या तुलनेत कमी पैशात आपण विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागातून आल्याने या मुलांबद्दल असलेली भावना, नाते अधिक घट्ट करण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे नवले यांनी सांगितले; तसेच त्यांचे भाऊ श्रीराम नवले हेही ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी माफक शुल्क घेऊन बीड बायपासवर सर्व सुविधा उपलब्ध असलेले संस्कार निवासी वसतिगृह चालवतात. येथे दरवर्षी पाच ते सहा अनाथ मुलेही असतात. 

दरम्यान, महामंडळाने आतापर्यंत 509 लाभार्थींना 31 कोटी 94 लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे, असे जिल्हा समन्वयक प्रवीण आगवन पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com