एलबीटी मूल्यनिर्धारणासाठी खासदार मुख्यमंत्र्यांना भेटणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

लातूर - स्थानिक संस्था कर (एलबीटी) निश्‍चित करण्याबाबत व व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन करण्यात येत असलेला त्रास बंद करण्याच्या मागणीसाठी मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. 24) खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान, या प्रश्‍नांबाबत ता. 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन डॉ. गायकवाड यांनी दिले. 

लातुरात एक नोव्हेंबर 2012 पासून एलबीटी लागू झाली. त्यानुसार व्यापाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांसोबत मध्यस्थी करून एलबीटीचे दर निश्‍चित केले. यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एलबीटी जमा केला. याला मोठा प्रतिसाद मिळाला; मात्र आता जास्त करनिर्धारणासाठी त्रास दिला जात आहे. हा त्रास दूर करावा या मागणीसाठी मराठवाडा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने खासदार डॉ. गायकवाड यांना निवेदन सादर केले असता त्यांनी हे आश्‍वासन दिले. 

या शिष्टमंडळात मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा, संजय काथवटे, द्वारकादास सोनी, भारत बिराजदार, जमिल नाना शेख, बजाज, तेजस सेट, धीरज तिवारी, अजय राजपूत, रामेश्‍वर पुनपाळे, विजय पारीख, पवन पुनपाळे यांचा समावेश होता. 

Web Title: LBT pricing to meet the chief minister MP