गॅस टॅंकरला गळती, परभणी-नांदेड महामार्ग सहा तास बंद

कैलास चव्हाण
शुक्रवार, 6 जुलै 2018

स्फोट होण्याच्या भितीने परभणी-नांदेड राष्ट्रीय मार्गावरील वाहतुक पहाटे 3 वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद केलेली वाहतुक सहा तासानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने टॅंकर सुरक्षीतस्थळी हालविण्यानंतर सुरु करण्यात आली.

परभणी - परभणी-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर श्रीक्षेत्र त्रिधारा परिसरात असलेल्या गॅस पंपासमोरील वजन काट्याकडे जाणारा गॅस टॅंकर खड्यात गेल्याने शुक्रवारी (ता. 6) टॅंकरला गळती लागली. त्यामुळे स्फोट होण्याच्या भितीने या मार्गावरील वाहतुक पहाटे 3 वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद केलेली वाहतुक सहा तासानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने टॅंकर सुरक्षीतस्थळी हालविण्यानंतर सुरु करण्यात आली.

परभणी पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गॅस पंपावर गुरुवारी (ता. 5) रात्री एचपी कंपनीचा गॅस भरलेले टॅंकर आले होते. हे टॅंकर समोरील वजन काट्यावर वजन करण्यासाठी जात असताना पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने टॅंकर बाजुच्या खड्यात गेले. त्यामुळे काही वेळात टॅंकरमधुन गॅस बाहेर येऊन गळती सुरु झाली. पुढील धोका लक्षात घेता टॅंकर चालक व पंपावरील कर्मचाऱ्यांनी याची माहिती ताडकळस पोलीस ठाण्यास दिली. पहाटे तीन वाजता पोलिसांनी घटनास्थळी जात पुढील धोका लक्षात घेता या मार्गावरील वाहतुक बंद करुन गॅस गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरु केले. दरम्यान त्रिधारा पाटी ते नांदगाव आणि परभणी ते असोला पाटी  अशा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर सकाळी नऊ वाजता टॅंकरमधील काही गॅस सोडुन क्रेनच्या मदतीने टॅंकर सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले.त्यानंतर वाहतुक सुरु झाली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The leak to the gas tanker Parbhani Nanded highway closed for six hours