जालन्यातील धामणा धरणाला गळती 

प्रकाश ढमाले
बुधवार, 3 जुलै 2019

पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) : भोकरदन तालुक्यात मंगळवारी (ता. 2) मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भोकरदन  तालुक्यातील धामणा धरण सुमारे  90 टक्के भरले आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे धरणाच्या सांडव्याला चीरा गेल्यामुळे सांडव्याच्या भिंतीमधून पाणी गळती होत आहे. यामुळे धामणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये भीतिचे वातावरण आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धारणाला भगदाड पडून सात गावात धारणाचे पाणी शिरले आहेत. तर अनेक जण बेबत्त आहेत. त्यानंतर आता जालना जिल्ह्यातील धामणा धारणाच्या सांडवा भींतीला  तडे गेल्याने धामणा धरणातुन पाणी गळती सुरू झाली आहे. सध्या धारणात जावळपास 90 टक्के पाणी साठा आहे. साडव्याच्या भिंतीतुन  होणाऱ्या पाणी गळतीमुळे धामणा धारणाच्या पायथ्याशी असलेल्या शेलुद, लेहा गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसापासून पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपळ, शेलुद, लेहा, हिसोडा, दहिगाव आदी भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील 24 तासात जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पावसाची झड सुरू झाल्यास सांडत्यातून पाणी वाहुण काय होईल ? याची धास्ती ग्रामस्थामध्ये निर्माण  झाली आहे.

दरम्यान बुधवारी (ता. 3) जिल्हाधिकारी  रवींद्र बिनवडे यांनी या धामणा धारणाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leakages in Dhamana Dam at jalna