लातूर जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

लातूर - लातूर जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत औसा नगरपालिकेत राष्ट्रवादीने तर, अमदरपूरमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. उदगीरमधील निकाल अद्याप हाती आलेले नाहीत.

औसा नगरपालिका राष्ट्रवादीच्या हाती
औसा नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळविण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादीने 20 पैकी 12 जागा मिळविल्या. तर, नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादीचे अफसर शेख निवडून आले आहेत. राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपला 6, काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. 

अहमदपूरमध्ये त्रिशंकू स्थिती
अहमदपूर नगरपालिकांमध्ये 23 जागांपैकी राष्ट्रवादीला 9 जागांवर यश मिळाले आहे. तर, भाजपला सहा, बहुजन विकास आघाडीला चार आणि काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा मिळाल्याने याठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. नगराध्यक्षपदी बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कासनाळे 368 मतांनी विजयी झाल्या आहेत.

निलंग्यात भाजपची सत्ता
निलंगा नगरपालिकेत भाजपने 20 पैकी 13 जागा जिंकत सत्ता आपल्या हाती राखली आहे. तर, नगराध्यक्षपदी भाजपचे बाळासाहेब शिंगाडे विजयी झाले आहेत.

Web Title: Legislative Council results in latur district