मोसंबीच्या "आंब्या'बहार खरेदीला प्रारंभ

पाचोड (ता. पैठण) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मोसंबीच्या "आंब्या'बहाराच्या खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी सचिव नितीन विखे, मार्केट यार्ड संघटनेचे अध्यक्ष शेख इलियास सेठ यांनी बोली लावली.
पाचोड (ता. पैठण) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मोसंबीच्या "आंब्या'बहाराच्या खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी सचिव नितीन विखे, मार्केट यार्ड संघटनेचे अध्यक्ष शेख इलियास सेठ यांनी बोली लावली.

पाचोड (जि.औरंगाबाद) ः पाणीटंचाईच्या संकटातून सावरलेल्या या हंगामातील "आंब्या'बहाराची मोसंबी निघण्यास सुरवात झाल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाचोड (ता. पैठण) येथील मोसंबी बाजारपेठेत कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे खरेदी-विक्री बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली असून बुधवारी (ता. 21) पहिल्याच दिवशी सव्वाशे टन मोसंबीची आवक झाली.


कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे, मोसंबी मार्केट यार्डचे अध्यक्ष इलियाससेठ व केंद्रप्रमुख गणेश फासाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली बोली लावण्यात येऊन मोसंबी खरेदी-विक्रीला सुरवात करण्यात आली. पाणीटंचाईमुळे यावर्षी मोसंबीचे उत्पादन कमी असून गेल्या वर्षाच्या शेवटी मृगबहारच्या मोसंबीने तीस हजारांवर भाव मिळविला होता. यंदा मात्र पाणीटंचाईतून सावरूनही मोसंबीचे भाव कमालीचे घसरल्याचे दिसते. परराज्यांतील पावसामुळे सध्या मोसंबीच्या मागणीत घट झाल्याने मोसंबी आज रोजी वीस हजार ते सत्तावीस हजारांपर्यंत खरेदी करण्यात आली. गतवर्षी मोसंबीला चांगले दर मिळाल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. यंदा मात्र मोसंबीच्या मृगबहारला अपेक्षित भाव नसल्यामुळे शेतकरी निराश झाला असून, अल्पशा प्रमाणात मृग, हस्तबहाराच्या हंगामास सुरवात होण्याची सुचिन्हे दिसत आहेत. तूर्तास ओस पडलेल्या मोसंबी बाजारपेठेत "आंब्या'बहाराची आवक सुरू होऊन गजबज वाढली. पाच-सहा वर्षांपासून येथे परराज्यांतील व्यापारी मोसंबी खरेदीसाठी येतात. ते व स्थानिक व्यापारी खरेदी केलेली पैठण तालुक्‍यातील मोसंबी दिल्ली, आग्रा, मथुरा, हैदराबाद, कोलकत्ता, चेन्नई, बनारस, लखनौ, बंगलोर, राजस्थान, गुजरात, कानपूर, मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आदी ठिकाणी निर्यात करतात.


यावेळी शिवाजी भालशिंगे, इरफान बागवान, विनोद मोटकर, रईसुद्दीन बागवान, अनिस पटेल, फारुख सेठ, कौसर पटेल, गणीभाई, अस्लमभाई, अशफाक बागवान, जावेद शेख, अख्तरभाई, बाबा कदम, जाबेरभाई, काशीनाथ बोरकर, अब्बुभाई बागवान, अय्युब पठाण, शफिक बागवान, जाकेर आत्तार, सुनील बनसोड, फिरोज आत्तार, एजाजभाई आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com