बिबट्याने पाडला वासराचा फडशा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

बिबट्याने उंडणगाव (ता.सिल्लोड) शिवारात गट क्रमांक 743 मधील शेती असलेल्या बाळाराम धोंडिबा धनवई यांच्या वासराचा फडशा पडला. ही घटना गुरवारी (ता.तीन) मध्यरात्री घडली. यामुळे उंडणगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

उंडणगाव (जि.औरंगाबाद) ः बिबट्याने उंडणगाव (ता.सिल्लोड) शिवारात गट क्रमांक 743 मधील शेती असलेल्या बाळाराम धोंडिबा धनवई यांच्या वासराचा फडशा पडला. ही घटना गुरवारी (ता.तीन) मध्यरात्री घडली. यामुळे उंडणगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तीन महिन्यांपूर्वी परिसरात बिबट्याच्या डरकाळ्या शेतकऱ्यांनी ऐकू आल्या होत्या. एका शेतकऱ्याला तर बिबट्या समोर दिसल्याने जीव वाचविण्यासाठी झाडावर चढावे लागले होते. अनेकांना बिबट्याच्या पंजाचे ठसे दिसले होते; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून परिसरात दररोज पाऊस पडत असल्याने बिबट्याने जंगलाचा आधार घेतला होता. आता गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबला असून वातावरण स्वच्छ आहे. पावसाने उघडिप दिल्याने शिकारीसाठी दबा धरून बसलेला बिबट्या आता सक्रिय झाला असून, त्याने आता जंगलातून मोर्चा शेतशिवाराकडे वळवत शिकार करणे सुरू केल्याचे सदरील घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Attacked On Cow Cub