...असा धरणाच्या पाण्यात बिबट्या आला वाहून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

औरंगाबाद : सोयगाव परिसरात सततच्या पावसाने वेताळवाडीचे धरण आठवडाभरापासून ओव्हरफ्लो झालेले आहे. या धरणाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यात वाहून आलेल्या बिबट्याचा मृतदेह सोना नदीच्या पात्रात वेताळवाडी गावाजवळील पश्‍चिम बाजूला आढळून आला.

औरंगाबाद : सोयगाव परिसरात सततच्या पावसाने वेताळवाडीचे धरण आठवडाभरापासून ओव्हरफ्लो झालेले आहे. या धरणाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यात वाहून आलेल्या बिबट्याचा मृतदेह सोना नदीच्या पात्रात वेताळवाडी गावाजवळील पश्‍चिम बाजूला आढळून आला.

Aurangabad News
वेताळवाडी धरण

पुराच्या पाण्यात बिबट्या वाहून आल्याची घटना उघडकीस येताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, सोयगाव परिसरातील अतिवृष्टीचा तडाखा अजिंठा डोंगररांगातील वन्य प्राण्यांनाही बसला आहे. वेताळवाडी धरणाचे खोल गेलेले पाणी पिण्यासाठी गेला असताना तोल घसरून तो धरणात बुडाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वेताळवाडी धरण हे अजिंठ्याच्या डोंगराला लागूनच आहे. या डोंगरात वन्यप्राण्यांचा मोठा सहवास आढळून येत आहे. अंदाजे एक वर्ष वयाचा बिबट्या धरणाच्या सांडव्यातून वाहून वेताळवाडीच्या गावाजवळ सोना नदीच्या पात्रात मृतावस्थेत आढळून आला. सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप वाघचौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ, वनपाल गणेश सपकाळ आदींच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

क्लिक करा - 'उसको खतम करूंगा' म्हणत डोक्यात घातली कुऱ्हाड

वनरक्षक भिका पाटील, सुनील चंदवडे, गणेश परदेशी, चंद्रकांत इंगळे आदींच्या पथकाने बिबट्याला नदीच्या बाहेर काढले. घटनास्थळावर पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून वन विभागाच्या वतीने घटनास्थळी अंत्यसंस्कार केले.

हेही वाचा - असा सुरू होता घरातच बनावट नोटांचा कारखाना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard found dead in soygaon dam Aurangabad