गौर-मसलगा शिवारात सडलेल्या अवस्थेतील प्राणी 'बिबट्या की तरस' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leopards or Hyenas confusion Sample testing in forensic lab Forest department latur
गौर-मसलगा शिवारात सडलेल्या अवस्थेतील प्राणी 'बिबट्या की तरस'

गौर-मसलगा शिवारात सडलेल्या अवस्थेतील प्राणी 'बिबट्या की तरस'

निलंगा : गौर मसलगा ता. निलंगा शिवारात वन्य प्राणी गुरूवारी ता. 19 रोजी सडलेल्या अवस्थेत अढळला असून तो तडस असल्याचे वन विभाग सांगत असले तरी बिबट्या की तरस आहे व त्याचा मृत्यू कशामुळे मृत्यू झाला याचे फाॕरेन्सिक प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतरच याबाबतची स्पष्टता होणार आहे. याबाबत माहीती अशी की, तालुक्यातील गौर- मसलगा शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातील जाळीमध्ये सडलेल्या अवस्थेत बिबट्या सारखा दिसणाऱ्या वन्य प्राण्याचे अवशेष सापडले असून यासंबंधी माहिती निलंगा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने गुरूवारी ता. 19 रोजी दिली.

त्यानुसार पोलिसांनी वन विभागाचे तालुका वन अधिकारी संतोष बन यांना कळवले त्यानुषंगाने वन परिक्षेत्र अधिकारी शिल्पा गिते, वन अधिकारी एस. आर. बन, वनरक्षक ज्ञानेश्वर मंगरूळे, सोपान बडगणे यांनी घटनास्थळी गेले. मात्र त्यांना घटनास्थळही सापडत नव्हते. शेतकऱ्यांच्या मदतीने त्या ठिकाणी पोंहचल्यानंतर मृत सडलेल्या अवस्थेत एक वन्य प्राणी व त्याचे अवशेष दिसत होते. शरीरावरील संपूर्ण कातडे सडून गेले असून ते काळे पडले आहे. हा वन्य प्राण्याच्या सापळ्याकडे पाहिले असता बिबट्या असल्याचे जाणवत होता.

गौर मसलगा शिवारात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्यामुळे वन्य प्राण्याकडून ऊसाबरोबर अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस होते त्यामुळे शेतकरी हूसकावून लावण्यासाठी अनेक युक्ती लढवत असतात तर काही शेतकरी पिकांच्या भोवती ताराचे कुंपन करून विज प्रवाह सोडला जातो यामुळे हरीन रानडुक्कर अशा वन्य प्राण्यापासून पिकांचे संरक्षण होते त्यामुळे वन्य प्राणी अशाच विद्युत प्रवाहच्या धक्याने मृत झाला असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत अवस्थेतील प्राण्याचे अवशेष फॉरेन्सिक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतरच हा प्राणी कोणता हे स्पष्ट होणार असल्याचे वन परीक्षेत्र अधिकारी शिल्पा गिते यानी सांगितले.

मागील एक महिण्यापूर्वी केळगाव येथील वन विभागात बिबट्या आढल्याच्या बातम्या आल्या होत्या वन विभागाने बिबट्या नव्हे तर तडस असल्याचे सांगितले होते. तर गेल्या आठ दिवसापासून धनेगाव, वलांडी परीसरात बिबट्या सदृश वन्य प्राण्याचा वावर असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्याबाबत वनविभागाकडून शोध सुरू असला तरी

गौर मसलगा शिवारात सापडलेले वन्य प्राण्याचे अवशेष बिबट्याचे का तरसाचे यावर याबाबत तर्क वितर्क लढवत आहेत. मृत अवस्थेत सापडलेला हा प्राणी कोणता याचा तपास प्रयोग शाळेतील संशोधनाअंती लागणार आहे.

टॅग्स :LaturMarathwadaLeopard