आदिवासी आश्रमशाळांमधून इंग्रजी शिक्षणाचे धडे

आदिवासी आश्रमशाळांमधून इंग्रजी शिक्षणाचे धडे

हिंगोली : जिल्ह्यातील दोन आदिवासी आश्रम शाळा म्हणून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे इंग्रजी वर्ग सुरू होणार असल्याने आता आदिवासी आश्रमशाळातून विद्यार्थी इंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालय पाच शासकीय आश्रम शाळा सुरू आहेत. मात्र इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी मागील काही वर्षात विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होऊ लागले होते. त्यानुसार प्रकल्प अधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांनी बाहेर जिल्ह्यातील नामांकीत इंग्रजी शाळा मधून या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी देखील इंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. मात्र यावर्षी अद्यापही नामांकित इंग्रजी शाळांची यादी जाहीर झाली नसल्यामुळे इंग्रजी शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती.

हिंगोली जिल्ह्यातील सुमारे तीनशे आदिवासी विद्यार्थ्यांचे इंग्रजी शाळेतील प्रवेशाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी नामांकित इंग्रजी  शाळा पुढे आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती, शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार होते. याबाबतची माहिती आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ. राठोड यांनी आदिवासी विभागाचे सचिव, आदिवासी आयुक्त,  अपर आयुक्तांनाही याबाबतची माहिती देऊन प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमधून इंग्रजी वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला होता. यामुळे शासकीय खर्चाची मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर विद्यार्थ्यांनाही जिल्ह्यात राहूनच इंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवणे सोपे जाणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार अपर आयुक्त कार्यालयाने शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत इंग्रजी वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

त्यानुसार, कळमनुरी तालुक्यातील बोथी व जामगव्हाण या शाळांमधून तूर्तास इयत्ता पहिली व दुसरीचे इंग्रजी वर्ग सुरू केले जाणार जाणार आहेत. एका वर्गामध्ये चाळीस विद्यार्थ्यांची क्षमता असणार असून विद्यार्थी संख्येनुसार अतिरिक्त तुकड्या केल्या जाणार आहेत. पुढील काही दिवसातच इंग्रजी वर्ग सुरू करायची प्रक्रिया सुरू होणार आहे.

चौकटीचा मजकूर
प्रशिक्षित कर्मचारी : डॉ. विशाल राठोड
आदिवासी प्रकल्प कार्यालयातंर्गत शाळांमधून प्रशिक्षित शिक्षक कर्मचारी आहेत. त्यांचा फायदा या विद्यार्थाना होणार आहे. तसेच प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com