लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे

online education
online education

वसमत (जि. हिंगोली) : सध्या कोरोनामुळे लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनच्या काळातही वसमत शहरातील लालबहादूर शास्त्री शाळेने विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. त्यामुळे पालकांतून समाधान व्यक्त केले जात आहेत.

वार्षिक परीक्षेला काही दिवस शिल्लक असताना व अभ्यासक्रम अंतिम टप्प्यात असताना अचानक कोरोना विषानूच्या वाढत्या प्रमानामुळे राज्य सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.

इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर

 शाळेचे संचालक संदीप चव्हाण, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सहकार्याने व त्यांच्याच संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा प्रशासनाने इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करून मुलांचे अध्ययन पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. 

इयत्तेनुसार व्हाट्सॲप ग्रुप 

सर्वप्रथम पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा इयत्तेनुसार व्हाट्सॲप ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व विषयांचा गृहपाठ, विविध प्रयोग, उपक्रम, राबविण्यास सुरवात केली. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न

विद्यार्थी विज्ञानाचे विविध प्रयोग स्वतः करून त्यांचा व्हिडिओ बनवून शाळेच्या ग्रुपवर पाठवित आहेत. ऑनलाइन क्लास व ऑनलाइन टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेमार्फत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शाळेचे संचालक संदीप चव्हाण यानी सांगितले.

शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा

हिंगोली : जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन एप्रिल महिना उजाडला तरी होत नव्हते. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. मात्र, संघटनांच्या पाठपुराव्यानंतर फेब्रुवारीचे वेतन करण्यात आले. मात्र, मार्च महिन्याचे वेतन कधी होणार, याची प्रतीक्षा शिक्षकांना लागली आहे.

वेतन एक तारखेला होईना

दरमहा एक तारखेला शिक्षकांचे वेतन करण्यात यावे, अशा सूचना असूनही हिंगोली जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांचे वेतन एक तारखेला होत नाही. वेतानासाठी शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांकडे शिक्षक संघटनांना सतत पाठपुरावा करावा लागतो, असा आरोप केला जात आहे.

वेतन करण्याची मागणी

 राज्यातील इतर जिल्ह्यांतील शिक्षकांचे फेब्रुवारीचे वेतन मार्च महिन्यात १५ तारखेपर्यंत मिळाले होते. मात्र, हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन झाले नव्हते. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. जिरवणकर यांनी लेखा व वित्त अधिकारी डॉ. हिवाळे व शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे यांना संदेश पाठवून फेब्रुवारी महिन्याचे रखडलेले वेतन करण्याची मागणी केली. 

वेतन ७५ टक्केच मिळणार

त्यानंतर वेतन वितरणाला गती आली. तरीही बॅंकेतून पैसे मिळण्यासाठी १३ एप्रिलच उजाडणार आहे. माध्यमिक शिक्षकांना तर वेतनासाठी आर्थिक तरतूदच नसल्याने फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन कधी मिळणार, याची प्रतीक्षा शिक्षकांना लागली आहे. मार्च महिन्याचे वेतन ७५ टक्केच मिळणार असले तरी लवकरात लवकर करावे, अशी मागणी शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com