सरसकट कर्जमुक्तीसाठी वेळप्रसंगी संघर्ष करू; आदित्य ठाकरे यांचा इशारा 

Lets fight for debt relief says Aditya Thackeray
Lets fight for debt relief says Aditya Thackeray

जालना : महाराष्ट्रात सातत्याने दुष्काळ येत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार म्हणून जे जे करात येईल ते तर करूच, परंतू सरसकट कर्जमुक्तीसाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला तरी चालेल पण ती करवून घेऊच, अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारने केलेल्या कर्जमुक्तीवर आपल्या भावना व्यक्त केल्या. 

श्री. ठाकरे यांच्या हस्ते रविवारी (ता. 3) मराठवाडा पॅकेज अंतर्गत लाभार्थीना पशु-प्रदर्शनाच्या ठिकाणी धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, अनिरूध्द खोतकर, उपनेते लक्ष्मण वडले, संतोष सांबरे, भास्कर अंबेकर आदींची उपस्थिती होती.

प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर झालेल्या सभेत आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणुका आल्या म्हणून मी फिरत आहे असे नाही. महाराष्ट्रात दुष्काळ आला आहे. दुष्काळग्रस्तांचे आश्रु पुसण्यासाठी येथे आलो आहे. मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकऱ्यासह सर्वसामान्य अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शिवसेना मदत करीत आहे. 

गेल्या दीड वर्षापासून शेतकर्यासाठी कर्जमाफीची योजना राबविण्यात येत आहे. परंतू अद्यापही संपूर्ण कर्जमाफी झाली नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा सुरू आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या नसल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, कॅबिनेट बैठकीत यावर बुलंद आवाज उठवावा लागेल. शिवसेना जातीपातीचा विचार न करता दुष्काळग्रस्तांच्या नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभी राहील. दुधाच्या मार्केटींगसाठी मुंबईत मदत करू असेही ते म्हणाले. 
 

आम्ही एकत्र येऊ, की वेगवेगळे येऊ हे आताच काही बोलू शकत नाही. मात्र निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्र येऊन महारष्ट्रासाठी काम करतील आणि महाराष्ट्र घडवतील असे ही आदित्य ठाकरे म्हणाले.



खासदार दानवे म्हणाले की, शेती व्यवसाय हा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात शेतकर्यांनी शेतीपुरक व्यवसाय केला पाहिजे. दुग्धते जनावरे पाळून दुधाचा व्यवसाय केल्यास आर्थिक उन्नती होईल. यातूनच दुष्काळाचा सामना करता येऊ शकेल. केंद्र व राज्यसरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ब्रिटिशकालीन आणेवारीच्या पध्दतीत बदल केल्यामुळेच शेतकऱ्यांना मदत मिळत असल्याचे ते म्हणाले.

श्री. खोतकर यांनी प्रास्ताविक करून पशू प्रदर्शनाचा उदेस सांगितला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून दुग्धते जनावरामुळे आर्थिक संपन्नता येईल, हा संदेश गेल्यास दुष्काळाचा सामना करता येऊ शकणार आहे. शिवाय दुधाच्या उत्पादनातही वाढ होऊ शकेल.
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com