परवानाधारक 569 शस्त्रे पोलिसदरबारी जमा 

file picture
file picture

जालना - जिल्ह्यात गृहविभागाकडून तब्बल 641 परवानाधारक शस्त्रे देण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्यांसंदर्भातील गोंधळ संपुष्टात आल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांना शस्त्र जमा करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे 641 पैकी 569 शस्त्रे जमा करण्यात आली असून, 72 शस्त्रे अत्यावश्‍यक सुरक्षेच्या कारणामुळे बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

जालना जिल्ह्यात 641 शस्त्रांना परवाना देण्यात आला आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर तत्काळ जिल्ह्यातील प्रत्येक शस्त्र परवानाधारकांनी घेतलेल्या बारा बोरिंग व पिस्तूल जमा करणे बंधनकारक आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्यांचे रेकॉर्ड शोधण्यात पोलिसांचा अधिक वेळ गेला होता; मात्र त्यानंतर पोलिसांनी परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्यांचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शस्त्रे जमा करण्यास सुलभता आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 641 परवानाधारक शस्त्रांचा ठावठिकाणा पोलिसांकडे आहे. 
यामध्ये 569 परवानाधारक शस्त्रे पोलिसांकडे जमा झाली आहेत. तर 72 शस्त्रे अतिआवश्‍यक सुरक्षेच्या कारणावरून ते बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये बॅंक सुरक्षारक्षक, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सुरक्षारक्षकांकडील शस्त्रांचा समावेश आहे. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com