अडीच मिनिटांत फ्रीज तयार!

liebherr appliances
liebherr appliances

औरंगाबाद - देशातील रेफ्रिजरेटरच्या (फ्रीज) बाजारात जर्मन तंत्रज्ञानासह उतरलेल्या ‘लिभेर’ या कंपनीच्या उत्पादनांच्या निर्मितीला मंगळवारी (ता. आठ) प्रारंभ झाला. यात अडीच मिनिटाला एक फ्रीज तयार होणार असून, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून आता वर्षाकाठी पाच लाख फ्रीज भारतीय बाजाराला डोळ्यांपुढे ठेवून तयार केले जाणार आहेत. 

१३० देशांमधील व्यवसायातून ४४ हजार जणांना रोजगार देणाऱ्या लिभेर या कंपनीच्या जगातील पाचव्या प्लॅंटचे उद्‌घाटन मंगळवारी करण्यात आले. कंपनीचे डॉ. आयसोल्ड लिभेर आणि स्टेफनी वोल्फार्थ, राधाकृष्ण सोमय्याजी आणि कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांची उपस्थिती होती. नऊ एकरांतील या प्रकल्पात सध्या सुमारे तीनशे जणांना रोजगार मिळाला असून, पहिल्या टप्प्यात ५०० कोटींची गुंतवणूक या कंपनीने औरंगाबादेत केली आहे. भारतातील गरजा लक्षात घेऊन पाच वर्षे कंपनीने संशोधन केले आहे. या उद्योगाचा उद्‌घाटन सोहळा शेंद्रा येथे कंपनीच्या आवारात कंपनीचे कर्मचारी, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

स्वयंचलितवर भर
विस्तीर्ण परिसरात असलेल्या असेंब्ली लाईनवर प्रत्येक अडीच मिनिटाला एक फ्रीज तयार होईल, अशी माहिती फॅक्‍ट्री व्हिजिटदरम्यान देण्यात आली. उत्पादनांची चाचणी घेण्यासाठी आठ लॅब तयार करण्यात आल्या असून, त्या माध्यमातून वातावरणाची चाचणी केली जाणार आहे. यात तापमान, विद्युतप्रवाह, २०० पार्टची असेंब्ली करणाऱ्या लाईन या ७५ टक्के स्वयंचलित आहेत. फोम डोअर्स, आउटर शेल आदी गोष्टींची आसेंब्ली एकाच छताखाली आहे. २२०, २६५ आणि ३६५ लिटर प्रकारात लिभेरची उत्पादने पहिल्या टप्प्यात बाजारात आणली जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com