तरुणाच्या अवयवदानाने चौघांना जीवदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नांदेड - तरुणाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान, तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. अवयव वाहतुकीसाठी शहरात बुधवारी (ता. 5) जलदगती सुविधा (ग्रीन कॉरिडॉर) उपलब्ध करून देण्यात नांदेड पुन्हा यशस्वी झाले. दरम्यान, शहरातील हे चौथे अवयवदान आहे. 

नांदेड - तरुणाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान, तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. अवयव वाहतुकीसाठी शहरात बुधवारी (ता. 5) जलदगती सुविधा (ग्रीन कॉरिडॉर) उपलब्ध करून देण्यात नांदेड पुन्हा यशस्वी झाले. दरम्यान, शहरातील हे चौथे अवयवदान आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

माळाकोळी (ता. लोहा, जि. नांदेड) येथील ब्रेनडेड झालेल्या भुजंग गोरखनाथ मस्के (वय 30) यांच्या कुटुंबीयांनी दु-ख पचवून, मोठ्या औदार्याने अवयवदानासाठी संमती दिली. त्यानुसार त्यांचे हृदय मुंबईला, एक किडनी व लिव्हर औरंगाबादला, एक किडनी व डोळे नांदेडच्या गरजूंना देण्यात आले. त्यातून चौघांना जीवदान व दोघांना दृष्टी मिळणार आहे. 

मूर्तिकार असलेले भुजंग गोरखनाथ मस्के हे सोलापूर जिल्ह्यातील बासलेगाव (ता. अक्कलकोट) येथील मंदिराच्या रंगरंगोटीच्या कामासाठी गेले होते. काम करताना 26 नोव्हेंबरला दुपारी बाराच्या सुमारास तोल गेल्याने ते पडले. डोक्‍याला गंभीर मार लागल्याने कंत्राटदार रमेश हरी राठोड यांनी त्यांना सोलापूर येथील अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याबातची माहिती भुजंग मस्के यांचे भाऊ संतोष मस्के यांना फोनवरून दिली, त्यामुळे ते सर्वजण सोलापूरला गेले. तेथे प्रकृती गंभीर बनत चालल्याने भुजंग यांना नांदेडच्या यशोसाई रुग्णालयात 27 नोव्हेंबरला दाखल केले. त्यानंतर मंगळवारी (ता. 4) त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणीनंतर रुग्णालय सूत्रांनी भुजंग मस्के यांचा ब्रेनडेड झाल्याचे सांगितले. त्यानंतर तेथील डॉक्‍टरांनी भुजंग यांच्या नातेवाइकांचे अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले. दु-ख पचवून नातेवाइकांनी अवदान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती डॉ. त्र्यंबक दापकेकर यांनी दिली. त्यानंतर आवश्‍यक त्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. आज शस्त्रक्रिया करून रुग्णवाहिकेद्वारे, तसेच एअर ऍम्बुलन्सद्वारे ठरलेल्या ठिकाणी तत्काळ अवयव पाठविण्यात आले. 

Web Title: Life to four person because of organ donation