पत्नीचा खूनकरून रक्त पिणाऱया पतीस मरेपर्यंत जन्मठेप

पत्नीचा खूनकरून रक्त पिणाऱया पतीस मरेपर्यंत जन्मठेप

लातूर : पत्नीचा खूनकरून अंगाला रक्त लावणे व ओंजळीने तीचे रक्त पिणाऱया पतीस येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश व्ही. व्ही. जोशी यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अशा पद्धतीची शिक्षा ठोठावलीजाण्याची गेल्या अनेक वर्षातील ही पहिलीच घटना आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. विठ्ठल देशपांडे (बोरगावकर) यांनी काम पाहिले.

या बाबत अधिक माहिती अशी, लातूर येथील इंदिरानगर भागातील संजय पांडूरंग गायकवाड यांनी 2015 मध्ये पत्नी सागरबाई संजयगायकवाड यांचा चारित्र्यावर संशय घेवून वरवंटा, पहार व करवतीने वार करून क्रुरपणे खून केला होता. एवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्याने पत्नीचे रक्त स्वतःच्या अंगाला लावून घेतले. ते रक्त ओंजळीने पिलेही होते. या प्रकरणी मयतसागरबाई गायकवाड यांची जाऊ बबीता विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात संजय गायकवाड याच्याविरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

घटनेच्या दिवशी हे पती पत्नी घरात झोपले होते. त्यांचा मुलगा अजय दुसऱया खोलीत झोपला होता. पहाटेच्या वेळी संजय गायकवाडने पत्नी सागरबाई यांच्यावर पहार, करवतीने वार करण्यास सुरवात केली. त्यावेळी वाचवा वाचवा असा आवाज ऐकू आल्याने मुलगा अजय उठला. हा प्रकार त्याने पाहिला. त्यानंतर तातडीने त्याने जवळच राहत असलेल्या काकूला बोलावून आणले. त्यानंतर एका शेजाऱ्यालाही बोलावून आणण्यात आले. सर्वांनी हा प्रकार पाहिला होता. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने 13 साक्षीदार तपासण्यात आले. यात सुनावणीच्या वेळी मुलगा अजय गायकवाड तसेच मयताची जाऊ बबीता गायकवाड व इतर दोन प्रत्यदर्शी साक्षीदारांनी या आरोपीने त्याच्या पत्नीचा खून करून तीचे रक्त स्वतःच्या अंगाला लावून घेतले ते रक्त ओंजळीने पिल्याचे न्यायालयात सांगितले.

या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायालयाने संजय गायकवाड यास ता. 26 ऑक्टोबर ला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता विठ्ठल देशपांडे (बोरगावकर) यांनी साक्षी, पुरावे सादर केले होते. त्यांना परमेश्वर तल्लेवाड यांनी सहकार्य केले. तपास अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी काम पाहिले. पैरवीअधिकारी म्हणून नवनाथ कल्याणी हे होते.

'रामायणा'चे उदाहरण
रामाणयामध्ये कबंध राक्षस हा लोकांचे धड कापयाचा, त्याचा हार करून गळ्यात घालयाचा. तसेच त्यांचे रक्तही प्यायचा. अशा राक्षसाला जीवन जगण्याचा अधिकार नाही म्हणून रामांनी त्याचा वध केला. हे उदाहरण देत हे कृत्यही असेच व दुर्मिळातील दुर्मिळ आहे, त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. विठ्ठल देशपांडे यांनी न्यायालयात केली होती. हा खूनाचा प्रकार क्रुरतेचा आहे, पण या आरोपीच्या विरोधात या पूर्वीही एकही गुन्हा दाखल नाही, त्याने नियोजन करून खून केलेला नाही हेही सुनावणीत समोर आले होते. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेवून न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com