पाण्यात बुडणारा युवक जीवरक्षक पथकामुळे वाचला

जमील पठाण
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

कायगाव (ता.गंगापूर,जि.औरंगाबाद) येथे गोदावरी नदी पुलावर गणेश विसर्जन करण्यासाठी मित्रांसोबत आलेला एक 25 ते 27 वर्षीय युवक गरबडीत पाय घसरून पुलावरून नदीच्या वाहत्या पाण्यात  गुरुवारी (ता.12) दरम्यान पडला.दिवसभर पावसात उपाशीपोटी निःशुल्क काम करणाऱ्या जीव रक्षक दलाच्या युवकांनी एक किलोमीटर अंतरावरून विद्युतगतीने बोट आणून  केवळ दोन मिनिटांत  पाण्यात शेवटच्या घटका मोजत बुडणाऱ्या युवकाला वाचून जीवदान दिले.त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळाल्याने प्रशासनाने सुटकेचा  निःश्वास सोडून  जीवरक्षक युवकांचे कौतुक केले.

कायगाव (जि.औरंगाबाद ) : कायगाव (ता.गंगापूर,जि.औरंगाबाद) येथे गोदावरी नदी पुलावर गणेश विसर्जन करण्यासाठी मित्रांसोबत आलेला एक 25 ते 27 वर्षीय युवक गरबडीत पाय घसरून पुलावरून नदीच्या वाहत्या पाण्यात  गुरुवारी (ता.12) दरम्यान पडला.दिवसभर पावसात उपाशीपोटी निःशुल्क काम करणाऱ्या जीव रक्षक दलाच्या युवकांनी एक किलोमीटर अंतरावरून विद्युतगतीने बोट आणून  केवळ दोन मिनिटांत  पाण्यात शेवटच्या घटका मोजत बुडणाऱ्या युवकाला वाचून जीवदान दिले.त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळाल्याने प्रशासनाने सुटकेचा  निःश्वास सोडून  जीवरक्षक युवकांचे कौतुक केले.

औरंगाबाद पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील कायगाव टोका येथील गोदावरी-प्रवरा नदीला पूर आल्याने या ठिकाणी पुलावरून गणेश विसर्जनाची सोय असल्याने  नगर औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो गणेशभक्तांनी गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी आणल्या होत्या.दुपार पर्यन्त पाऊस सुरू असल्याने गर्दी कमी होती,दुपारून रात्री दहा पर्यन्त गणेश विसर्जन चालले. मात्र औरंगाबाद मोठे गणेश मंडळ चे गणपती मिरवणूक करत आल्याने त्यांना या ठिकाणी येऊ पर्यन्त उशीर झाला.

या दरम्यान गर्दीत छायाचित्र घेण्याच्या नादात तोल जाऊन गोदावरी नदीच्या वाहत्या युवक पडला. येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आलाऊसिंग करून होडी,बोट तात्काळ घेऊन येण्याचे जोरदार आवाहन केले. रामेश्वर मंदिर च्या गोदावरी घाटाजवळ उपस्थित असलेले जीवरक्षक दशरथ बिरुटे यांनी तो आलाऊसिंग चा आवाज ऐकून लगेचच त्यांनी जीवरक्षक दलचे महेश खिरे, अक्षय बिरुटे,अमोल बिरुटे,गणेश गहिरे व तहसिल च्या विजू वाढे यांना सोबत घेऊन नगरपालिकाची बोट सुसाट वेगाने नेत अवघ्या दोन मिनिटांत एक किलोमीटर अंतर कापीत गोदावरी नदीच्या पुला जवळ पोहचले.बोट च्या प्रकाशात पुलावरून सोडलेल्या जोरीच्या दिशेने पाण्यात हात पाय मारणाऱ्या युवका जवळ पोहचले.

बोटमधून अक्षय बिरुटे,अमोल बिरुटे यांनी जीवाची पर्वा न करता नदी उडी मारून त्यास बोट मध्ये घेतले.त्याचे पोट दाबून पाणी बाहेर काढले.त्यास तात्काळ रामेश्वर मंदिर जवळील घेऊन जाऊन तेथून 108 च्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचार्थ औरंगाबादला हलविले.शुद्धीत आल्यानंतर त्या तरुणांचे नाव आदिल हाजील शेख वय 25 ते 27 वर्षे राहणार खंडोबा मंदिर सातारा औरंगाबाद येथील  असून त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी  सकाळ ला दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life Saving Squad Saved Youth