मराठवाडा विद्यापीठातर्फे जीवनगौरव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवलेल्या आठ जणांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यात ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्‍वर पाठक, बुलडाणा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोयायटीचे राधेश्‍याम चांडक, युनेस्कोचे संचालक राजेंद्र शेंडे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, आदर्शग्राम पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरक्षारक्षक तुकाराम जनपदकर गुरुजी, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नामदेव कांबळे या मान्यवरांचा समावेश आहे.

विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्धापनदिनी गुरुवारी (ता. २३) पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी आज दिली.

Web Title: Lifetime Achievement Award declared by Marathwada University