खून करणाऱ्यास जन्मठेप 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

नांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून करणाऱ्यास प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया यांनी बुधवारी (ता. १३) जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. यावेळी मयताचे नातेवाईक न्यायालयात हजर होते.  

नांदेड: किरकोळ कारणावरून एकाचा निर्घृण खून करणाऱ्यास प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया यांनी बुधवारी (ता. १३) जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. यावेळी मयताचे नातेवाईक न्यायालयात हजर होते.  

इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गंगानगर भागात तत्कालीन उपमहापौर शमीम अब्दुला यांच्या घरासमोर जुन्या वादातून अलीखान मुख्तारखान (वय २२) याने गजानन हरिभाऊ गाडे (वय २२) रा. महंतवाडी, मरघाट, नांदेड याला रस्त्यात अडवून वाद घातला. एवढेच नाही तर त्याच्या छातीवर बरगडीत तिक्ष्ण हत्याराने वार केला. ही घटना ता. २० फेब्रुवारी २०१६ रोजी घडली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गजानन गाडे याला त्याच्या नातेवाईकांनी शासकिय रुग्णालयात दाखल केले. परंतु जबर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी अनुसयाबाई हरिभाऊ गाडे (वय ५०) यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात अलीखान मुख्तारखान याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) अशोक बनकर यांनी करून आरोपीला अटक केली. त्याची जामीनावर काही दिवसांनी सुटका झाली.

या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयाने यात बारा साक्षिदार तपासले. सर्व पुरावे ग्राह्य धरुन प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया यांनी अलीखान याला जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाची बाजू ॲड. एन. एन. कोलनुरकर यांनी मांडली. तर आरोपीचा बचाव ॲड. आर. जी. परळकर यांनी केला. 

हे ही वाचा 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणची रॅली 

नांदेड : कायद्याची व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा न्यायालय ते आयटीआय चौकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शनिवारी (ता. १६) नोव्हेंबर रोजी सकाळी निघणार आहे.   
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त राष्ट्रीय विधी सेवा व महाराष्ट्र विधी सेवा यांचेमार्फत राबवण्यात येणा-या विविध योजना व दिल्या जाणा-या मोफत विधी सहाय याबाबत माहिती देण्याकरिता शनिवारी सकाळी साडेसात वाजता निघणार आहे. 

या रॅलीमध्ये नांदेडकरांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक अ. धोळकिया आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचीव तथा न्यायाधिश आर. एस. रोटे यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lifetime for the killer