लिंगायत मुद्द्याने समाजात फूट पाडण्यासाठी राजकारण्यांचा डाव - मनोहर धोंडे

मनोज साखरे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

काहीजण धर्मात फूट पाडत आहेत, त्यांच्यापासून सावध राहा, मोर्चात कुणीही सहभागी होऊ नका असे आवाहन शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी केला आहे.

औरंगाबाद : स्वतंत्र धर्म, अल्पसंख्यांक दर्जाच्या गोंडस नावाखाली समाजात फूट पाडण्याचा राजकारण्यांचा प्रयत्न आहे. राजकीय लोकांची सुपारी घेऊन काहीजण धर्मात फूट पाडत आहेत, त्यांच्यापासून सावध राहा, मोर्चात कुणीही सहभागी होऊ नका असे आवाहन शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी केला आहे.

वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द आहेत. वीरशैव लिंगायत धर्म हि संकल्पना शिवा संघटनेला मान्य आहे. परंतु लिंगायत धर्म संकल्पना मान्य नाही. कारण शब्दछल, बुद्धिभेद करून मतांसाठी, खुर्चीसाठी राजकीय खटाटोप सुरु आहेत. धर्ममान्यता व अल्पसंख्याक दर्जा या बाबी कायदेशिरदृष्ट्या तूर्तास शक्य नाही. काँग्रेसने चारवेळा धर्म मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जाची मागणी धुडकावली. आता कर्नाटक येथील काँग्रेस सरकार धर्ममान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या पोकळ आणि फसवे प्रयत्न करीत आहेत. समाजात फूट पाडून सहा हजार दोनशे वर्षाचा इतिहास पुसण्याचे, गट निर्माण करण्याचे आणि सत्ता निर्मितीचा प्रयत्न सुरु आहेत. असा आरोप प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Lingayat Communities demand is manipulated by Politician says manohar dhonde