औरंगाबादेत लिंगायत धर्म महामोर्चा 

योगेश पायघन 
रविवार, 8 एप्रिल 2018

क्रांतीचौक परिसर दणाणला 
मी लिंगायत माझा धर्म लिंगायत, भारत देशा बसव बसवेशा, बव्व लिंगायत कोटी लिंगायत, लिंगायत धर्माला मान्यता मिळालीच पाहीजे, बसवेश्‍वरांचा विजय असो असे फलक घेऊन तरुणाईसह समाजबांधव व महिला मोठ्यासंख्येने जमले आहेत. तर महिलांनी भगवे फेटे तर पुरुष मंडळी भगव्या टोप्या परिधान करुन बसेवेश्‍वरांचा जयघोष क्रांतीचौकात करीत असल्याने परिसर दणाणुन गेला आहे.

औरंगाबाद : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व राष्ट्रीयस्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा, आज निघणाऱ्या मोर्चासाठी रविवारी (ता. 8) सकाळपासुन मराठवाड्याच्या कान्याकोपऱ्यातुन जथ्थेच्या जथ्थे क्रांतीचौकाच्या दिशेने येत आहेत. तासाभरात हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दिशेने निघणार असुन त्यासाठी क्रांतीचौक परिसरात मोठ्यासंख्येने समाजबांधव जमले आहेत. त्यांना फलक, झेंडे, टोप्यांचे वाटप करण्यात येत आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीने क्रांतीचौकात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन अग्निशामक व रुग्णवाहीकांची व्यवस्था करण्यात आली आहे. क्रांतीचौकात उभारण्यात आलेल्या स्टेज जवळ समाजातील ज्येष्ठ मंडळी आलेल्या समाजबांधवांना मार्गदर्शन करत आहे. तर पाणी नाश्‍त्याची व्यवस्थेसाठी जागोजागी स्टॉल उभारण्यात आले आहे. तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी असुन सध्या जमलेल्या समाजबांधवात महिलांचीही लक्षणीय उपस्थिती आहे. दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान या मोर्चाचे प्रस्थान विभागीय आयुक्त कार्यालयाकडे होण्याची शक्‍यता आहे. 

अखिल भारतीय लिंगायत समन्वयक समितीतर्फे हा महामोर्चा काढण्यात येत असुन मराठवाडा विभागीय लिंगायत महामोर्चाचे चोख नियोजन करण्यात आले आहे.क्रांतीचौकात जिल्हा समितीचे समन्वयक प्रदीपआप्पा बुरांडे, गुरुपाद पडशेट्टी, सचिन खैरे, वीरभद्र गादगे, विश्‍वनाथ स्वामी, ज्ञानेश्‍वर खर्डे, दीपक उरगुंडे, शिल्पाराणी वाडकर, जयश्री लुंगारे, चंपाताई झुंजरकर, सुंदरताई सुपारे आदीसह मान्यवर महामोर्चात शांतता, संयम व शिस्तीने आवाहन करत असुन पोलीसांना सहकार्य करण्याच्या सुचना देत आहेत. मोठ्या संख्येने या महामोर्चात समाजबांधव सहभागी होण्याची शक्‍यता असुन समारोप विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. 

क्रांतीचौक परिसर दणाणला 
मी लिंगायत माझा धर्म लिंगायत, भारत देशा बसव बसवेशा, बव्व लिंगायत कोटी लिंगायत, लिंगायत धर्माला मान्यता मिळालीच पाहीजे, बसवेश्‍वरांचा विजय असो असे फलक घेऊन तरुणाईसह समाजबांधव व महिला मोठ्यासंख्येने जमले आहेत. तर महिलांनी भगवे फेटे तर पुरुष मंडळी भगव्या टोप्या परिधान करुन बसेवेश्‍वरांचा जयघोष क्रांतीचौकात करीत असल्याने परिसर दणाणुन गेला आहे.

महामोर्चासाठी लिंगायत समाजबांधवांचे जत्थे पोचले औरंगाबादेत
अल्पसंख्यांक दर्जा आणि सांविधानिक धर्म मान्यतेच्या मागणीसाठी आयोजित महामोर्चात सहभागासाठी औरंगाबादेत लिंगायत समाजाचे जत्थे पोचत आहेत. शहराच्या प्रवेशाच्या सहाही मार्गावर मोर्चेकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.

Web Title: lingayat community morcha in Aurangabad

टॅग्स