रक्ताचा थेंब असेपर्यंत धर्ममान्यतेसाठी लढा - डॉ. शिवलिंग शिवाचार्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

औरंगाबाद - छोट्या-मोठ्या धर्माला मान्यता मिळते; परंतु प्रमुख धर्मालाच मान्यता नाही. हा दोष शासनाचा नाही, तर आम्ही आवाज उठविला नाही म्हणून ही वेळ आली. आता धर्ममान्यता दिली नाही, तर केंद्र शासनाला झोप लागू देणार नाही. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत धर्ममान्यतेसाठी लढा सुरूच राहील, असा इशारा राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर यांनी आज येथे केंद्र सरकारला दिला. लिंगायत महामोर्चाच्या समारोपसभेत ते 
बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘धर्ममान्यतेवर समाजबांधव बोलत आहेत; परंतु धर्ममान्यतेत येणाऱ्या समस्यांवर कुणीच बोलत नाही. आता समस्यांचा वेध घेण्याची वेळ आली आहे. लिंगायतांची स्वतंत्र जनगणना व्हावी, धर्ममान्यता मिळावी यासाठी पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांची भेट घेऊन मागणी केली होती; परंतु त्यांची हत्या झाल्यानंतर या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष झाले. धर्ममान्यता मिळविणे सोपी बाब नाही. यात प्रक्रिया पूर्ण करणे, विरोधाला सम्यक उत्तर देणे महत्त्वाचे आहे.’’ हिंदू धर्मच नाही तर ती संस्कृती आहे, राष्ट्र आहे. आम्ही या राष्ट्राचे मूळ मालक आहोत, असे हिंदुत्ववाद्यांना त्यांनी ठणकावून सांगितले. 

Web Title: lingayat mahamorcha dr. shivling shivacharya talking

टॅग्स