लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

लातूर - राज्यात एक कोटीच्या जवळपास असणाऱ्या लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे सरकार दरबारी धूळ खात पडून आहे. सरकार त्याचा गांभीर्याने विचार करत नसल्याने येत्या 16 ऑगस्टपासून राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा लिंगायत महासंघातर्फे मंगळवारी (ता. 7) देण्यात आला.

आरक्षणासाठी मराठा, धनगर समाजाचे सध्या राज्यभर आंदोलने सुरू आहेत. मुस्लिम समाजाने दहा ऑगस्टपासून जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता लिंगायत समाजानेही 16 ऑगस्टपासून रस्त्यावर उतरून आंदोलनाची घोषणा केली आहे. लिंगायत समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईला रवाना झाले आहे; पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांना वेळ दिली नाही. पुढील आठवडाभरात मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर 16 ऑगस्टपासून आंदोलनाला सुरवात होईल, असा निर्णय लिंगायत महासंघाने पुण्यात झालेल्या बैठकीत घेतला.

Web Title: Lingayat Society Agitation for reservation