गोव्यातील दारूचा औरंगाबादेत अफलातून 'उद्योग'

मनोज साखरे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

दोन्ही संशयितांची पोलिसांनी चौकशी केली असता गोव्यातून मद्य खरेदी करून शहरात विक्रीचा फंडा त्यांनी वापरला. यातून जादा पैसे कमावण्याचा त्यांचा मानस होता अशी माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद - गोव्यात विविध ब्रँडची दारू खरेदी करून औरंगाबादेत विकण्याचा खटाटोप दोघांनी केला. मात्र ही अफलातून युक्ती जास्त काळ टिकली नसून या दोन विक्रेत्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हि कारवाई बुधवारी (ता. 25) रात्री पाऊने अकाराच्या सुमारास एमआयडीसी वाळूज येथील गुड इयर कंपनीसमोरील चौकात केली.

संतोष प्रल्हादराव जाधव (वय 36, रा. नागेश्वरवाडी) व पुण्यवर्धन चंद्रभान साळवे (वय 25, रा. पवनगर, हडको एन -09) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते एमआयडीसी वाळूज येथील चौकात मद्यविक्रीसाठी येणार असल्याची बाब गुन्हे शाखा पोलिसांना समजली. त्यांनी या चौकात गस्त वाढवली. दरम्यान एक दुचाकी आणि ओम्नी वाहन त्यांना दिसले. या वाहनाची त्यांनी तपासणी केली. त्यात विविध ब्रॅण्ड्सचे विदेशी मद्य सापडली हे मद्य पोलिसानी जप्त केले आहे. दोन्ही संशयितांची पोलिसांनी चौकशी केली असता गोव्यातून मद्य खरेदी करून शहरात विक्रीचा फंडा त्यांनी वापरला. यातून जादा पैसे कमावण्याचा त्यांचा मानस होता अशी माहिती समोर आली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The liquor of Goa was sold in Aurangabad

टॅग्स