परराज्यातून विक्रीसाठी आलेला चार लाखाचा दारूसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

औरंगाबाद : दादर नगर हवेली राज्यात उत्पादित चार लाख रुपये किंमतीचा विदेशी दारूसाठा शनिवारी (ता.19) रात्री नगर नाका उड्डाणपुलाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला.अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक प्रदीप वाळुंजकर यांनी रविवारी (ता.20) दिली

दादर नगर हवेली येथे उत्पादित व त्याच राज्यात विक्री होणारा विदेशी मद्य विक्रीसाठी औरंगाबाद शहरात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली त्यानुसार विभागाने सापळा रचून शनिवारी(ता.19) रात्री अकरा वाजता लाल रंगाची चार चाकी वाहन वाहनात हे विदेशी मध्ये आढळून आले. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने विजय नगर येथील विक्रम आघाडी साळुंखे यास अटक करून त्याच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे.

विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक राहूल रोकडे यांनी ही कारवाई केली. यावेळी निरीक्षक प्रकाश घायवत, जावेद कुरेशी, दुय्यम निरीक्षक के.पी जाधव, मोहन मतकर, आशिष महिंद्रकर, गणेश इंगळे यांनी यांच्यासह जवान शेंदुरकर, कोतकर, लखानी, गुंजाळ, चाळनेवार, गायकवाड, वानखेडे, खरात यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे. पुढील कारवाई निरीक्षक राहुल रोकडे करीत आहेत.

Web Title: liquor of rupees 4 lakhs seized