बिबट्याच्या तावडीतून थोडक्यात बचावली चिमुरडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

लखमापूर (औरंगाबाद) : लखमापुर येथील हनुमान वाडीवर काल सायंकाळी बिबट्याचे हल्ल्यात आठ वर्षाची बालिका थोडक्यात वाचली असून भितीचे वातावरण तयार झाले आहे. 

हनुमान वाडिवर धीरज काळे यांचे शेतात कामाला असलेले  मजूर केदु खराटे, यांची आठ वर्षाची मुलगी रंजना काल संध्याकाळी सात वाजेदरम्यान घराजवळ खेळत असताना बाजूला शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झेप घेतली. मुलगी मोठ्याने ओरडली असता तिचे आई वडील लगेच धावल्यामुळे सुदैवाने मुलगी वाचली पण मुलीची काही वेळापुरती वाचा बंद झाली होती.

तेथील लोक लगेच जमा झाले. वन विभागाने या ठिकाणी पिंजरे लावले असून बिबट्या जवळून जातो पण पिंजऱ्यात काही केल्या अड्कत नाही. केदु खराटे यांनी या घटनेबाबत तेथेच काही अंतरावर असलेल्या आपल्या भावाला ही माहिती दिली. तो येत असताना त्यांना बाकीचे तीन बिबटे दिसले.

वनविभागात या घटनेची माहिती देण्यात आली. हा प्रकार नित्याचाच झाला असल्याने तेथील रहिवासी मोठ्या दबावाखाली वावरत आहे. वस्तीवरील मुलांना घराबाहेर पडणे सुद्धा मोठ्या मुश्कीलीचे झाले आहे. काय करावे असा प्रश्न पडला आहे. 

लखमापुर परिसरातील असा कोणताच भाग शिल्लक नाही की तेथे बिबट्याची भीती नाही. परंतु येथील भाग हा कादवा नदी काठावर आहे व बाजूला मोठा नाला असल्याने बिबटे या भागात सुरक्षित ठाण मांडून आहेत. काही दिवसांपूर्वी येथे एक बालक बिबट्याने खाल्ले होते.

येथील शेतकरी सांगतात की, चार बिबटे असून एक नर, मादी आणि दोन बछडे आहेत. राजरोसपणे भक्ष शोधत फिरत असतात. त्यामुळे आमचे जीवन अगदी धोक्याचे बनले आहे.

वनविभागाने या ठिकाणी सर्व प्रकारचे प्रयत्न केले पिंजरे लावले. ड्रोन कॅमेरे, इतकेच काय वन कर्मचारी पण पिंजऱ्यात बसले. सतत परिस्थिती वर नजर ठेऊन आहे. बकरी ठेवली जाते तरी पण अपयश येत आहे. वनाधिकारी सुनिल वाडेकर, वनपाल एल .बी .धनगर, के .डी .कडाळे आदि कर्मचारी सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. परत दुसऱ्या जागेवर पिंजरा लावणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

Web Title: Little girl escaped from the clutches of a leopard