अतिभयंकर! सलाईनच्या बाटलीत चक्क शेवाळ, बीडमधील प्रकार... 

दत्ता देशमुख
मंगळवार, 28 जानेवारी 2020

बीड येथील जिल्हा रुग्णालयात सलाईनच्या बाटलीत शेवाळ आढळून आले आहे. शासकीय पुरवठा होणारे सलाईन "जीव वाचविण्यासाठी की जीव घेण्यासाठी?' असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सुदैवाने येथील जिल्हा रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील धोका टळला आहे. 
 

बीड - येथील जिल्हा रुग्णालयात सलाईनच्या बाटलीत चक्क शेवाळ आढळले असून, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने धोका टळला आहे.

राज्यपातळीवर शासकीय खरेदी करून रुग्णालयांना हे सलाईन पाठविण्यात आले आहे. डेनिस केम लॅब या उत्पादक कंपनीचे हे सलाईन 1807017142 या क्रमांकाच्या बॅचचे आहे. त्याची मुदत सप्टेंबर 2020 मध्ये संपणार आहे. या बाटतील द्रवामध्ये मोठ्या प्रमाणावर शेवाळाचे घोष आढळून आले आहेत. 

>

आता पूर्णतः निर्जंतुकीकरण करून तयार केलेल्या या बाटलीत शेवाळ तयार कसे झाले? हा मोठा प्रश्‍न आहे. उत्पादक कंपनीने पॅकिंग करताना काळजी घेतली नाही की निर्जंतुकीकरणच केले नाही? असाही प्रश्‍न आहे.

हेही वाचा - निर्बल पुरुषांनाही कसा होतो कच्च्या केळीचा फायदा, वाचा...

अगोदरच शासकीय पुरवठ्यांबाबत असे प्रकार घडत असल्याने सरकारी रुग्णालयांतील गोळ्या-औषधी घेण्यास टाळण्याचे प्रकार घडतात. आता चक्क बाटलीत शेवाळ आढळल्याने रुग्णांचा विश्वास कसा राहणार? असाही प्रश्‍न आहे. सतर्कतेमुळे धोका टळला असला तरी असा घातक पदार्थ रुग्णाच्या शरीरात जाणे मोठ्या धोक्‍याचे ठरू शकते. 

हेही वाचा - नगर-बीड-परळी लोहमार्गासाठी शासनाकडून 63 कोटींचा निधी

दरम्यान, सलाईन हे थेट नसेतून रक्तात जाते. त्यामुळे असे दूषित घटक रक्तात गेल्यानंतर पायोजेनिक इन्फेक्‍शन, फंगल इन्फेक्‍शन होऊ शकते. रुग्णाला इनाथायलाईटिक शॉक बसू शकतो. 2016 मध्ये हैदराबाद येथे असा प्रकार घडला होता. डोळ्यांबाबतीत तर हे अतिघातक आहे.

हेही वाचा - निवडणूक काळातील खर्चाची उड्डाणे, बीडमध्ये झाडाझडती

परभणी आणि काही वर्षांपूर्वी बीडमध्ये नेत्रशस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना इन्फेक्‍शन झाले आणि प्रकरण राज्यभर गाजले. मात्र, शस्त्रक्रियेसाठी 50 प्रकारच्या वस्तू वापराव्या लागतात. त्यात असा दूषित घटक मिश्रित वस्तू आल्याने असे प्रकार घडतात; परंतु त्याचे खापर शस्त्रक्रिया करणाऱ्यांवर फोडले जाते. बीडमध्ये सापडलेले शेवाळ असलेले सलाईनदेखील नेत्र विभागातच आढळले आहे. 

ही वाचा - बीड क्राईम-प्रतिकार करणाऱ्या मुलावर चोरट्याकडून चाकूचे सपासप वार

असाच पुरवठा सुरू राहणार का? 
शासनाच्या विविध पुरवठ्यांमध्ये मोठमोठे कंत्राटदार आणि उत्पादकांची साखळीच असते; मात्र रुग्णालयांसाठी औषधी व तत्सम वस्तू पुरवठ्यांबाबत सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी सतर्क असायला हवे. असे प्रकार थेट रुग्णाच्या जिवावर उठू शकतात. ज्या कंपनीच्या बाटलीत हे शेवाळ आढळले आहे, त्याबाबत आता सरकार काय निर्णय घेणार? हे पाहावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Lives Of Patients In Beed City Are At Risk