सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करु ः धनंजय मुंडे

शेख मुनाफ
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी करु. भाजप, शिवसेनेच्या यात्रा त्यांनी केलेल्या विकासकामे दाखवण्यासाठी नाही तर आम्हीच सत्तेत येणार आहोत, असे दाखवण्यासाठी होती. पवार साहेबांवर खोटा गुन्हा दाखल करुन बदनाम करण्याचा प्रयत्न या युती सरकारने केला. शेतकऱ्यांची कामे केली नाही, कर्जमाफी कागदावर त्यामुळे धास्ती घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी विकासाचे चित्र रंगवुन विरोधात कोणी राहु नये म्हणुन इतर पक्षाचे लोक घेवुन विरोध संपविण्याचा प्रयत्न केला, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी आडुळ (ता.पैठण) येथे मंगळवारी  (ता.15) महाआघाडीचे उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केले.

आडुळ  (जि.औरंगाबाद) ः महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी करु. भाजप, शिवसेनेच्या यात्रा त्यांनी केलेल्या विकासकामे दाखवण्यासाठी नाही तर आम्हीच सत्तेत येणार आहोत, असे दाखवण्यासाठी होती. पवार साहेबांवर खोटा गुन्हा दाखल करुन बदनाम करण्याचा प्रयत्न या युती सरकारने केला. शेतकऱ्यांची कामे केली नाही, कर्जमाफी कागदावर त्यामुळे धास्ती घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी विकासाचे चित्र रंगवुन विरोधात कोणी राहु नये म्हणुन इतर पक्षाचे लोक घेवुन विरोध संपविण्याचा प्रयत्न केला, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी आडुळ (ता.पैठण) येथे मंगळवारी  (ता.15) महाआघाडीचे उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवर जोरदार टिका केली.

यावेळी  आमदार सतीश चव्हाण,  तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, माजी मंत्री अनिल पटेल, विनोद तांबे, हाजी मुक्तार मौलाना, भाऊसाहेब तरमळे, एकनाथ गवळी, शिवाजी गावंडे, भाऊसाहेब पिसे, शार्दुल गावंडे, राजुभाई विटभट्टीवाले, शेख नासेर, हारुणभाई पठाण, डॉ.गुलदाद पठाण, रुस्तुमराव बनकर यांची उपस्थिती होती. श्री.मुंडे म्हणाले कि,  ब्रम्हगव्हाण योजना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत्नाने दहा वर्षापुर्वी मंजुर करण्यात आली. त्या योजनेशी काडीमाञ संबध नसलेल्या मध्ये त्याचे श्रेय घ्याची चढाओढ लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loan Waive For All Farmers - Dhananjay Munde