लॉकडाउन : आशा वर्कर्सना धान्य वाटप- जयश्री जैस्वाल

प्रल्हाद कांबळे
Monday, 20 April 2020

माँ संतोषी मुलींचे हॉस्टेलच्या संचालिका जयश्री संजय जयस्वाल व त्यांचे सहकारी यांनी हे काम करीत आहेत. 

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनमध्ये हातावर पोट असलेल्यांचे बेहाल होत आहे. मात्र काही समाजसेवी संघटनांनी पुढाकार घेत अशा गरजु लोकांना धान्य वाटप करण्यात येत आहे. माँ संतोषी मुलींचे हॉस्टेलच्या संचालिका जयश्री संजय जयस्वाल व त्यांचे सहकारी यांनी हे काम करीत आहेत. 

लॉकडाऊनमध्ये सुरुवातीपासून ते आजपर्यंत रामनगर, गौतमनगर, सांगवी येथे जवळपास एक हजार २०० गरजु लोकांना खिचडी, पोळी, भाजी व मिठाई अशा स्वरुपाचे भोजन देण्यात येत आहे. मजूर कुटुंबांना आधार दिला. तसेच तेथील मजूर कुटुंबांना ७० धान्याच्या किटचे वाटप करून निराधार कुटुंबांना लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात दिलाय. परप्रांतीय मजूर शासनाच्या निगराणीत येथील एका मंगल कार्यालयात आसरा घेत असून या सर्वांना सकाळी नऊ वाजता अल्पपोहार देण्यात येत आहे. 

महापालिकेचे उपमहापौर सतीष देशमुख यांची उपस्थिती

तसेच उपेक्षित आशा वर्कर्सना धान्याची किट वाटप केले. जयश्री जयस्वाल यांनी सोमवारी (ता. २०) वित्तनगर येथील मॉ. संतोषी महिला वसतीगृह येथे सर्व ३२ आशा वर्कर्सना बोलावून त्यांचा सन्मान केला. तसेच महापालिकेचे उपमहापौर सतीष देशमुख व नायब तहसिलदार उर्मिला कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून त्यांना धान्याचे किट वाटप करण्यात आले. यासाठी जयश्री संजय जयस्वाल,  नादिया सहा, संतोष बारसे, रमेश तालीमकर, गुलाब ठाकूर, ऋषिकेश म्हस्के, धनंजय उमरीकर, दिलीप नवगाळे, श्री. लोहिया व श्री. धूत परिवार यांनी सहकार्य केले.

हेही वाचालॉकडाउन : १६५ जणांना अटक- पीआय चिखलीकर

नारायणसिंघ तबेलेवाले तर्फे तखत सचखंड आणि लंगरसाहेबला निधी 

नांदेड : शीख समाजातील सरदार नारायणसिंघ तबेलेवाले (बबलू महाराज ) यांनी सोमवारी (le. 20) आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत लंगर सेवेसाठी एक लक्ष एक हजार रुपयांचा निधी भेट दिला आहे. तसेच त्यांनी गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डला ५१ हजार रुपयांचा धनादेश बोर्डाचे अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांच्याकडे सुपुर्द केला. वाधवा यांनी त्यांचा सिरेपाव देऊन सत्कार केला. 
गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य स. गुरमीतसिंघ महाजन, गुरुद्वाराचे माजी अधीक्षक स. शेरसिंघ तबेलेवाले, पत्रकार स. रविंदरसिंघ मोदी, स. मनमोहनसिंघ तबेलेवाले आदींची ही उपस्थिति होती. 

लंगरसेवासाठी दिला निधी

सध्या कोरोना संक्रमणाच्या रोकथामासाठी सर्वत्र लॉकडाउन सुरु आहे. लाखोंच्या संख्येत गरजूं, गरीब आणि उपाशी लोकांना गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड आणि गुरुद्वारा लंगर साहेब तर्फे लंगर वितरण (अन्नदान ) करण्यात येत आहे. सतत तीन आठवड्यापासून शहराच्या विविध भागात सेवा सुरुच आहे. नारायणसिंघ यांनी वरील सेवेत आपला लहान योगदान म्हणून राशी दिली आहे. संतबाबा बलविंदर सिंघ आणि गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष स. लड्डूसिंघ महाजन यांनी नारायणसिंघ यांचे अभिनंदन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown: Grain Allocation for aasha Workers nanded news