लातुरकरांना दिलासा! दीड महिन्यानंतर लॉकडाउन शिथिल

दुकाने दुपारी दोनपर्यंत सुरू राहणार; वीकेंड लॉकडाऊन कायम
latur
laturlatur

लातूर: जिल्हयातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असून रूग्णालयांतील बेडही शिल्लक राहत आहेत. यामुळे राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्ह्यात दीड महिन्यापासून लागू केलेला लॉकडाऊन (covid 19 lockdown) मंगळवारपासून  (ता. एक) शिथिल केला आहे. यामुळे आता जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांसोबत अन्य दुकानेही सकाळी सात ते दुपारी दोन या काळात सुरू राहणार असून शनिवार व रविवारच्या वीकेंड लॉकडाऊन (weekend lockdown) कायम रहाणार आहे. सोमवारी (ता. 31) सायंकाळी लॉकडाऊनच्या शिथिलतेबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी आदेश काढले असून फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातूनही पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आदेशाचा तपशील विशद केला.

जिल्ह्यात 29 मेच्या अहवालानुसार कोरोनाचा आठवडी पॉझिटिव्हीटी साडेसात टक्क्यापर्यंत खाली आला आहे. यासोबत जिल्ह्यात सरकारी व खासगी रूग्णालयात उपलब्ध आयसीयु व ऑक्सिजन बेडपैकी 88.69 टक्के बेड शिल्लक आहेत. रूग्ण असलेल्या बेडची संख्या ४० टक्क्यांहून कमी असल्याने पृथ्वीराज यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सध्या वीकेंड लॉकडाऊन वगळता सकाळी सात ते अकरा दरम्यान सुरू असलेली सर्व जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने आता सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. या दुकानांच्या वेळेतच महिन्यांपासून बंद असलेली सर्व अत्यावश्यक गटात नसलेले ईतर दुकाने सुरू रहाणार आहे. यात केवळ एकल स्वरूपाची दुकाने सुरू ठेवता येणार असून मॉल्स व शॉपिंग सेंटर बंद रहाणार आहेत.

latur
चांगली बातमी! लाल परी पुन्हा धावणार रस्त्यावर

वीकेंड लॉकडाऊन कायम ठेवल्याने सर्व दुकाने शनिवार व रविवारी बंद राहणार आहेत. आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तूदेखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येणार आहेत. दुपारी दोननंतर वैद्यकीय किंवा ईतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त सर्व नागरिकांच्या हालचालीवर बंधने रहाणार आहेत. कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त ईतर सर्व शासकीय कार्यालये पंचेवीस टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू रहाणार आहेत. जास्त कर्मचाऱ्यांसाठी विभाग प्रमुखांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम असून व्यायामशाळा व क्रिडा संकुले बंद राहणार आहेत.

latur
जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठ्याची फोटोंमधून करा सैर

शेतीविषयक दुकाने पाचपर्यंत-

शेतीशी संबंधित सर्व दुकाने आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या काळात खरीप पेरणीच्या तयारीसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या दुकानावर जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी असेल. ठरवून दिलेल्या वेळेनंतर दुकान सुरू ठेवल्यास दंडाची कारवाई करून कोरोनाची साथसंपेपर्यंत ते बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी आदेशात म्हटले आहे. बिअर बार, हॉटेल व रेस्टारंटसाठी होम डिलिव्हरी सुरू राहिल. स्पा व हेअर सलूनची सेवाही घरपोच देता येतील. पूर्वनियोजित लग्न व त्या अनुषंगाने होणारे सर्व कार्यक्रम पूर्वीप्रमाणेच पंचेवीस व्यक्तींच्या उपस्थितीत स्वगृही दोन तासाच्या आत पार पाडावे लागणार आहेत. अंत्यविधीसाठी वीस जणांना उपस्थित रहाता येणार असून परीक्षांसाठी प्रवेश पत्र दाखवून विद्यार्थ्यांना केंद्रावर जाण्याची परवानगी असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com