esakal | लॉकडाउनची घोषणा अन् खरेदीसाठी तोबा गर्दी, कुठे ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारपासून सहा ते १९ ऑगस्ट अशी १४ दिवसांची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्याने लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नागरिकांची मंगळवारी गर्दी उसळली होती. तसेच बँकेत मंगळवारी ग्राहकांची गर्दी झाली होती.

लॉकडाउनची घोषणा अन् खरेदीसाठी तोबा गर्दी, कुठे ते वाचा...

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात गुरुवारपासून सहा ते १९ ऑगस्ट अशी १४ दिवसाची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्याने लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नागरिकांनी दोन महिने पुरेल एवढा किराणा माल, शेतीकामात बैलासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी तर बँकेतही रोख रक्कम जमा व काढण्यासाठी मंगळवारी रांगा लागल्या होत्या. 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. लोकप्रतिनिधीसह आता अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील लागण झाली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सातशेच्यावर गेला आहे. शहरातही नारायणनगर, पलटण, मोंढा, गोदावरी हॉटेल, गाडीपुरा, वंजारवाडा, रिसाला, श्रीनगर, गंगानागर, गावळीपुरा, देव गल्ली आदी भागात कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कन्टेन्टमेन्ट झोन घोषित करून हा परिसर सील केला आहे.

बड्या अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा... 

नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने शहरासह, जिल्हाभरात संचारबंदी लागू करावी यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. परंतू, शहरात रुग्णांची तर एका बड्या अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याने पुन्हा प्रशासकीय अधिकारी यांच्यात चलबिचल सुरू झाली. आणि अखेर १४ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घोषित केला. 

पोळा सणानिमित्त खरेदी... 
 
जिल्हाधिकारी जयवंशी यांनी ज्या दिवशी लॉकडाऊन करणार त्यापूर्वी दोन दिवस पहिले जाहीर करू, त्यामुळे नागरिकांना दोन दिवसांची मुभा मिळेल. अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी वेळ मिळेल असे सांगितले होते. गुरुवारपासून लॉकडाउन जाहीर केल्याने मंगळवारी शहरातील बाजारपेठेत ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांनी किराणा दुकानावर गर्दी केल्याचे दिसून आले. तर काही शेतकऱ्यांनी दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बैल पोळा सणानिमित्त लागणारे साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरातील सर्वच बँकेत व्यवहार करण्यासाठी बँकेत एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते.

बॅँकेत तोबा गर्दी... 
 
आता १४ दिवस संचारबंदी लागू असल्याने ग्रामीण भागातील सेवनिवृत नागरिक पेन्शन घेण्यासाठी व मंजूर झालेले पीक कर्ज घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, युनियन बँक, एचडीएफसी आदी बँकेत नागरिकांनी पैसे काढण्यासाठी तर गर्दी झाली होती. दोन दिवस मुभा असल्याचा फायदा घेत नागरिक कोरोनाची भीती न बाळगता फिरताना दिसून येत होते. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top