लोहारा परिसरात दीड तास पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

लोहारा - शहारासह परिसरात रविवारी (ता. चार) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तब्बल दीड तास जोरदार पाऊस झाला. मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.

लोहारा - शहारासह परिसरात रविवारी (ता. चार) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तब्बल दीड तास जोरदार पाऊस झाला. मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.

मागील काही दिवसांपासून उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. आज सहा वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन सव्वासात वाजता दमदार पावसाला सुरवात झाली. शहरासह मार्डी, बेंडकाळ, नागराळा, मोघा, माळेगाव, खेड, कास्ती (खुर्द), लोहारा (खुर्द) या भागांत तब्बल दीड तास जोरदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. या जोरदार झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. मागील महिन्यापासून उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पावसास सुरवात होताच वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

Web Title: lohara marathwada news rain in lohara