Loksabha 2019 : लातूरमध्ये मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा

हरी तुगावकर
गुरुवार, 18 एप्रिल 2019

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दुपारच्या वेळेस मतदार घराच्या बाहेर पडणार नाहीत, हे लक्षात घेऊन सकाळच्या वेळेस जास्तीत जास्त मतदान कसे होईल, हे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याकडून पाहिले जात आहे.

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेला आज (गुरुवार) सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

मतदान सुरू होण्यापूर्वी सकाळी सहा ते पावणे सात या वेळेत प्रत्येक मतदान केंद्रावर अभिरूप मतदान प्रक्रिया झाली. त्यानंतर सर्व मशीन सील करण्यात आल्या. सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदानासाठी आलेल्या मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत व विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासूनच घराबाहेर पडून मतदार मतदान केंद्रापर्यंत कसे येतील यासाठी प्रयत्न करीत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दुपारच्या वेळेस मतदार घराच्या बाहेर पडणार नाहीत, हे लक्षात घेऊन सकाळच्या वेळेस जास्तीत जास्त मतदान कसे होईल, हे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याकडून पाहिले जात आहे.

Web Title: Lok Sabha Election Phase 2 polling begins in Latur