चिकलठाणा विमानतळावर पार्किंग ठेकेदाराची लूट 

चिकलठाणा विमानतळावर पार्किंग ठेकेदाराची लूट 

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय चिकलठाणा विमानतळावर पार्किंगच्या ठेकेदाराने प्रवाशांची लूट सुरू केली आहे. रविवारी (ता. दहा) सायंकाळी पार्किंगच्या ठेकेदाराने लूट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कॉर्पोरेट ट्रेनर असलेल्या प्रवाशाने थेट विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार केल्याने औरंगाबाद विमानतळाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. 

चिकलठाणा विमानतळावर गेल्या अनेक दिवसांपासून पार्किंग ठेकेदाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. अवाच्या सवा रक्कम उकळण्याचा नवीन फंडा ठेकेदाराने सुरू केला आहे. विशेष म्हणजे ठेकेदार आणि प्रवाशांमध्ये वारंवार संघर्षाचे प्रकार होत आहेत. रविवारी (ता. दहा) सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रवासी हैदराबादला जाण्यासाठी रिक्षाने  विमानतळावर आला होता; मात्र ठेकेदाराने रिक्षा पार्किंगसाठी वीस रुपयांची मागणी केली. यापूर्वीही याच ठेकेदाराचा अनुभव असल्याने सदर प्रवाशाने पैसे देण्यास नकार दिला. मुळात प्रवासी  सोडण्याच्या काळात पाच मिनिटांसाठी पार्किंग मोफत असतानाही पैसे मागितल्याने वाद निर्माण झाला. पार्किंगच्या ठेकेदाराने कमर्शियल वाहन असल्याने पैसे लागणारच असे सांगत अरेरावी केली. त्यामुळे या प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ तयार करून विमानतळ प्राधिकरण आणि नागरिक उड्डाण मंत्रालयाला ट्विट केले आहे. त्याचप्रमाणे चिकलठाणा विमानतळ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे.

विमानतळाची बदनामी 
विमानतळावर पार्किंगचा ठेकेदार प्रवाशांची ही अरेरावी विमानतळ प्राधिकरणाची बदनामी करणारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सदर प्रवाशाने केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com