तर शिवसेनेचे नुकसान...- रामदास आठवले

उमेश वाघमारे
मंगळवार, 12 जून 2018

जालना : शिवसेनेने भाजप सोबतची 30 वर्षांची युती लोकसभा निवडणुकीत टीकवावी. जर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत भाजप सोबत युती केली नाही, तर नुकसान शिवसेनेचे होणार आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता.12) जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यावेळी आठवले म्हणाले की, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची नुकतीच दोन-अडीच तासांची बैठक झाली. शिवसेना-भाजप युती संदर्भातील युती उद्धव ठाकरे यांनी आपल्या भूमिकेत बदल करुन 30 वर्षांची युती लोकसभा निवडणुकीत कायम ठेवावी. शिवसेना-भाजप युती संदर्भात उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मी बोललो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच बोलतील. जर शिवसेनेने भाजपसोबत युती केली नाही. तर शिवसेनेचे नुकसान होईल, असे नमूद करून आरपीआय-भाजप एकत्र लोकसभा निवडणूक लढणारा असल्याचे ही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Web Title: loss to shivsena says ramdas athavale