नांदेड : बसपचे बेपत्ता उमेदवार सापडले

bagate
bagate

नांदेड : नांदेड (उत्तर) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले बहुजन समाज पक्षाचे (बसप) उमेदवार डॉ. प्रकाश बगाटे यांचा शोध लागला. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी उमरखेड येथून बुधवारी (ता. १६) पहाटे दोनच्या सुमारास ताब्यात घेतले. 

नांदेड उत्तर विधानसभा निवडणूकीसाठी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ. प्रकाश गोविंदराव बगाटे हे नेहमीप्रमाणे सकाळी प्रचारासाठी घराबाहेर पडले. या मतदार संघात त्यांना वाढता प्रतिसाद लक्षात घेता विरोधकांनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप नातेवाईक व पक्षाच्या वतीने करण्यात आला. सोमवारी (ता. १४) सकाळी ११ वाजल्यापासून ते अचानक बेपत्ता झाले. त्यांचा शहरभर व मित्र- मंडळीकडे शोध घेतला परंतु ते सापडले नाही. अपहरण केलेल्या उमेदवाराचा तात्काळ शोध लावून निवडणुक निकाल जाहीर होईपर्यंत त्यांना सुरक्षा द्यावी, तसेच नांदेड उत्तर विधानसभेची निवडणुक रद्द करावी अशी मागणी बसपच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवणूक अधिकारी यांच्याकडे एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. या अपहरणप्रकरणी बबिता बालाजी पाईकराव यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे करित होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी आपल्या पथकासह त्यांच्या शोध घेतला. 

मोबाईल लोकेशनवरून बुधवारी (ता. १६) पहाटे दोनच्या सुमारास उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथून ताब्यात घेतले. त्यांची पोलिसांनी अधिकची चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना सांगितले की, छत्रपती चौकातून अनोळखी दोघांनी माझ्याजवळ येऊन जयभिम घातला. मीही त्यांना जयभिम घातला. त्यातील एकाने माझ्या नाकावर जबर मार दिला. यात मी बेशुध्द झालो. त्यानतंर मी किनवट येथे आलो. कसा आलो हे मला समजत नाही. त्यानंतर मी एका वाहनामधून उमरखेड येथे पोहचलो. पोलिसांनी त्यांच्याकडून एक मोबाईल जप्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com