प्रेम प्रकरणातून दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

वैजापूर - प्रेम प्रकरणातून तरुण-तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खंबाळा (ता.वैजापूर) शिवारात मंगळवारी (ता. तीन) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. सागर राहुल म्हैसमाळे (वय २२) व साक्षी बाबासाहेब शेजवळ (वय १८, दोघेही रा. जांबरगाव) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमयुगलांची नावे आहेत. 

याबाबतची माहिती अशी, की जांबरगाव येथील सागर हा तालुक्यातील ग्रामीण भागातील बाजारांमध्ये जाऊन साहित्य विक्रीचा व्यवसाय करीत होता. तर सागरच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. साक्षीचे वडील शेती करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. साक्षीला तिच्या वडिलांनी सोमवारी (ता. दोन) दुपारी महाविद्यालयातून घरी आणले. मात्र, त्यानंतर ती बेपत्ता झाली. घरच्यांनी शोध घेतला पण ती सापडली नाही. 

मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास लाडगाव रस्त्यावर रोठी वस्तीजवळच्या खंबाळा शिवारातील लिंबाच्या झाडाला एकाच ओढणीने गळफास घेतलेले दोघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव, गुणवंत थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली.  येथील उपजिल्हा रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी पोलिस पाटील अर्जुन साठे यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: lover suicide