फुलांचे झाले अश्रू! ; किमतीचे सीमोल्लंघन नाहीच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदा झेंडूच्या फुलांची विक्रमी आवक झाली. त्यातच परतीच्या पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्याचा फटका फूल उत्पादकांना बसला असून, विजयादशमीच्या पूर्व दिवशी दुपारनंतर झेंडूफुलांचे भाव पडले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. 

औरंगाबाद : दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदा झेंडूच्या फुलांची विक्रमी आवक झाली. त्यातच परतीच्या पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्याचा फटका फूल उत्पादकांना बसला असून, विजयादशमीच्या पूर्व दिवशी दुपारनंतर झेंडूफुलांचे भाव पडले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. 

दोन दिवसांत शहरात 1,364 क्‍विंटल झेंडूच्या फुलांची आवक झाली. त्यातच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरात फुले घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. यंदा बुलडाणा, जालना जिल्ह्यासह सोयगाव तालुक्‍यातून शेतकरी झेंडूची फुले विक्रीसाठी आली होती. दुपारपर्यंत झेंडूला शहरात चाळीस रुपये किलोने विक्री झाली. दुपारी पाऊस पडल्यानंतर विक्रीसाठी आलेला फुलांचा माल भिजला. यामुळे चाळीस रुपयांवरून थेट 15 ते 20 रुपयांपर्यंत भाव कोसळले. क्‍विंटलामागे रविवारी (ता. सहा) अडीच हजार ते तीन हजार रुपये दर मिळाला तर सोमवारी हाच दर दीड हजार ते अडीच हजार होता. 

अनेकांनी रस्त्यांवर फेकली फुले 
दुष्काळ, अतिवृष्टी या दोन्हीचा मार सोसत घेतलेले फुलांचे उत्पन्नास चांगला दर मिळेल. यातून सण-उत्सव आनंदात जाईल. याच आशेने अनेक शेतकऱ्यांनी फूल शेती केली; मात्र दसऱ्याच्या पहिल्या दिवशी आचानक वाढलेली आवक आणि आलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. सुरवातील चाळीस रुपयांचा दर नंतर 15 आणि 20 रुपये किलोने दराने ग्राहक फुले मागू लागल्यामुळे काही शेतकऱ्यांनी संतप्त होऊन झेंडूचा माल रस्त्यावर फेकून दिला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Low price for marigold flowers