18 भावी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले एम डी सिंहकडून धडे; बीड आणले होते देशात पहिले

दत्ता देशमुख
मंगळवार, 15 जानेवारी 2019

ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान मिळविला होता. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्याकडून जिल्ह्याने हा क्रमांक कसा गाठला याची माहिती घ्यायला 18 भावी जिल्हाधिकारी जिल्ह्यात आले आहेत. 

बीड: ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान मिळविला होता. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्याकडून जिल्ह्याने हा क्रमांक कसा गाठला याची माहिती घ्यायला 18 भावी जिल्हाधिकारी जिल्ह्यात आले आहेत. 

बीड जिल्ह्याची ओळख कायम दुष्काळी, ऊसतोड मजूरांचा जिल्हा अशीच आहे. नापिकीमुळे आत्महत्यांचे प्रमाणही जिल्ह्यात अधिक आहे. मात्र, 2016-17 मध्ये जिल्ह्यात 12 लाखांवर खातेदारांनी 45 लाख रुपयांची पिक विमा संरक्षित रक्कम भरली. कायम नापिकी आणि दुष्काळामुळे चिंतीत असलेल्या शेतकऱ्यांना 265 कोटी रुपयांचा विमा भेटला. याबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. देवेन्द्रसिंह यांना प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र, ही किमया साधण्यामागे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांचा पाठपुरावा आणि नियोजन होते. इतर कामांमुळे बँका पिक विम्याची संरक्षीत रक्कम भरुन घेत नाही, ऑनलाईन विमा भरण्याचे पोर्टल जॅम होते, कृषी विभागाकडून जनजागृती होत नाही अशी सर्वत्र कायम ओरड होत असतानाही सिंह यांनी नियोजन आणि पाठपुरावा केल्याने तब्बल 12 लाख खातेदारांना आपल्या पिकाची विमा संरक्षीत रक्कम भरता आला.

विमा हफ्ता, विमा संरक्षण यांची सुटसुटीत माहिती देणारे माहिती पत्रक ग्रामीण भागात वितरित केले गेले, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी तसेच रविवारी बँका सुरु ठेवून विमा हफ्ता भरून घेतला. तसेच यासाठी व्हाट्सएपच्या ग्रुप मधून माहिती शेतकऱ्यापर्यंत देण्यात आली. त्यामुळे बीड जिल्हा देशात टॉपवर आला. दरम्यान, भारतीय प्रशासन सेवेसाठी निवड झालेल्या आणि सध्या मसूरी येथे प्रशिक्षण घेत असलेले 18 परिविक्षाधिन अधिकारी याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात आले आहेत. प्रशिक्षणानंतर विविध पदांवर काम करताना दुष्काळ, पिक विमा, जलसंधारण अशा उपाय योजना या अधिकाऱ्यांना कराव्या लागणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या योजना कशा राबविल्या याचे धडे हे पथक घेत आहे. यामध्ये अनुपम अंजी. गरमा पनवार, टी. शुभमंगला, भुवनेश पाटील, चेतन कुमार मिना, गिरीश बडोले, जयवीर राहूल सुरेश, जय प्रवेश, कुमार दिपक, मनिष कुमार, राजीव कुमार चौधरी, रोहन घुगे, संजय कुमार मिना, सौरभ गंगवार, शेखर कुमार चौधरी, श्रीनिवास पाटील, तेजस पवार, वीराज तिडके या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: M. Devendra Singh has brought the beed first in the country