यंत्र दुरुस्तीसाठी ‘डीएमईआर’ने ‘घाटी’कडून मागविला प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विविध यंत्रसामग्री ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाल्याची परिस्थिती आहे. त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. ही बाब ‘सकाळ’ने वृत्तमालिकेतून उघड केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) घाटी प्रशासनाला यंत्रसामग्री, दुरुस्ती व परीक्षणाच्या उद्दिष्टाअंतर्गत उपलब्ध केलेल्या १२ कोटी ३२ लाख दोन हजार रुपयांच्या आकस्मिक निधीतून दुरुस्ती निधीचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे.

सहा स्लाईस सीटी स्कॅन, एमआरआय, दोन सोनोग्राफी, दोन एक्‍स-रे, एक सीआर्म, चार व्हेंटिलेटर आदींसारखे यंत्र ‘घाटी’त बंद पडल्याने रुग्णांना महागड्या तपासण्या खासगी डॉक्‍टरकडून करून घेण्याची वेळ आली आहे; तर उपचारासाठी लागणारे यंत्रही बंद असल्याने नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याची पोलखोल ‘सकाळ’ने केली होती. यासंबंधी शनिवारी (ता. सात) ‘डीएमईआर’ने यंत्र दुरुस्तीचा प्रस्ताव १२ एप्रिलपर्यंत पाठविण्याचा आदेश ‘घाटी’ला दिला आहे. यामध्ये गेल्यावर्षीच्या आलेल्या निधीचे विवरण व २०१८-१९ साठी आवश्‍यक निधीच्या मागणीसंबंधी विचारणा करण्यात आल्याचे ‘डीएमईआर’कडून सांगण्यात आले; तसेच इतर शासकीय महाविद्यालयांनाही यासंबंधीची विचारणा करीत त्यांनी कार्यासन अधिकारी डहाडे यांनी आदेशित केले आहे. यासंबंधी पाऊने सहा कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी दिली.

Web Title: machine repairing dmer ghati hospital proposal