"मेड इन औरंगाबाद'ने वेधले लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

औरंगाबाद - औरंगाबादच्या उद्योजकांनी सातासमुद्रापार झेप घेऊन नावलौकिक मिळविला. मात्र, त्याची माहिती बहुतांश वेळा शहरातील नागरिकांसह शासनालादेखील नसते. मात्र, ऍडव्हान्टेज महाराष्ट्र प्रदर्शनात उभारलेल्या "इन औरंगाबाद' दालनाने शहराचे वैभव सर्वांसमोर एकत्रित आणले. हे वैभव, संपत्ती आणि जागतिक स्तरावर शहराने मिळवलेली ख्याती बघून बघणारे अवाक्‌ झाले. 

औरंगाबाद - औरंगाबादच्या उद्योजकांनी सातासमुद्रापार झेप घेऊन नावलौकिक मिळविला. मात्र, त्याची माहिती बहुतांश वेळा शहरातील नागरिकांसह शासनालादेखील नसते. मात्र, ऍडव्हान्टेज महाराष्ट्र प्रदर्शनात उभारलेल्या "इन औरंगाबाद' दालनाने शहराचे वैभव सर्वांसमोर एकत्रित आणले. हे वैभव, संपत्ती आणि जागतिक स्तरावर शहराने मिळवलेली ख्याती बघून बघणारे अवाक्‌ झाले. 

याबाबत माहिती देताना मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे (मासिआ) माजी अध्यक्ष सुनील किर्दक म्हणाले, ""मेड इन औरंगाबादचा मुख्य उद्देश ऑटोमोबाईल, टेक्‍नॉलॉजी, व्हाईट गुड, ऍग्रोफूड, ब्रेव्हरीज, फार्मास्युटिकल्स, ऍग्रोकेमिकल्स, इन्फ्रास्ट्रक्‍चर, रिन्यूएबल एनर्जी आणि अजिंठा-वेरूळ लेणीचे वैभव सर्वांसमोर आणणे. औरंगाबाद हे भारताचे ऑटो कंपोनंट हब आहे. भारतात कुठेही दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तयार होत असेल तर त्यासाठी सरासरी तीस ते पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत वेगवेगळे पार्ट शहरातील उद्योजकांमार्फत तयार केलेले वापरले जातात. ही बाब अभिमानास्पद आहे. ऐंशीपेक्षा अधिक देशांना औरंगाबादमधील उद्योजक तंत्रज्ञान निर्यात करतात. यामध्ये प्रामुख्याने मशिनरी, टूल्स, वेगवेगळी उपकरणे, रोबोटिक्‍स आदींचा समावेश आहे. व्हाईट गुड अर्थातच कन्झ्युमर गुड्‌समध्ये औरंगाबादचे नाव अव्वल आहे. त्याला वेगवेगळे पार्ट पुरविणारे व्हेंडर विकसित झाले. त्यामुळे शहरात टीअर वन, टीअर टू आणि टीअर थ्रीची चेन निर्माण झाली. त्याशिवाय ऍग्रो फूड प्रोसेसिंग उद्योगाला चांगली गती मिळते आहे. त्याव्यतिरिक्‍त फार्मास्युटिकल, ब्रेव्हरीज, ऍग्रोकेमिकल, इन्फ्रास्ट्रक्‍चर, रिन्यूएबल एनर्जीमध्ये इनोव्हेटिव्ह उत्पादने निर्माण केलेली आहेत. ती भारताबाहेरसुद्धा पाठवली जातात. पर्यटनाच्या दृष्टीने अजिंठा-वेरूळ लेणीकडे जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शोकेज्‌ करण्यात आले.'' 

नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी 
"मेड इन औरंगाबाद' दालनात शहरातील उद्योजकांनी अथक प्रयत्नाने असंख्य उत्पादने तयार केली. या उत्पादनांची ख्याती देशासह देशाबाहेरसुद्धा पोचली. एकाच ठिकाणी शहराच्या औद्योगिक वसाहतीमध्ये तयार करण्यात आलेली उत्पादने एकाच छताखाली आणण्यास मासिआला यश आले. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांना चालना मिळेल. केंद्र व राज्य सरकारचा शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल. औरंगाबादकरांना आपल्या औरंगाबादमध्ये काय तयार होते, हेही कळेल. या प्रदर्शनातून नव्या संकल्पना घेऊन नवउद्योजकसुद्धा घडतील, अशी अपेक्षा संयोजकांनी व्यक्‍त केली.

Web Title: Made in Aurangabad attention