स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर

राजेभाऊ मोगल  
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली. याबद्दलची माहिती मिळताच विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्यासह सिडको पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत काळ्या रंगाने तो हॅशटॅग मिटविला. दरम्यान, हा हॅशटॅग कुणी लिहला, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. 

या पुलाचे मागील काही महिन्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुल असे नामकरण करण्यात आलेले आहे. मात्र, चौकात वसंतराव नाईक यांचा पुतळा आहे. तसेच जवळच वसंतराव नाईक यांच्या नावाचे महाविद्यालय आहे. त्यामुळे या पुलास वसंतराव नाईक उड्डाणपुल असे नाव द्यावे, अशी बंजारा समाजाने मागणी केलेली होती. त्यासाठी अनेक आंदोलनेही केली. तसेच राजमाता जिजाऊ असे नाव द्यावे, अशी मागणी देखील समोर आलेली होती. मात्र, पुलास सावरकर यांचे नाव देण्यात आले. असा या पुलाचा इतिहास आहे.

शुक्रवारी सकाळी ही घटना समोर येताच पोलिस निरीक्षक उदार, पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, गोकुळ लोदवाल, मच्छिंद्र जाधव, भास्कर नरवडे, विलास काळे, अर्जून चव्हाण, भिमराव देसले यांनी धाव घेतली. त्यानंतर काळ्या रंगाच्या माध्यमातून हा हॅशटॅग मिटविण्यात आला. यानिमित्ताने पुन्हा एकदा पुलाच्या नावावरून वाद निर्माण होण्याची व्यक्‍त होत आहे. हे कृत्य करणाऱ्यांचा आम्ही शोध घेत आहोत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: #mafivirsavarkar on savarkar bridge at aurangabad