कोटींचे रेडे अन्‌ लाखमोलाचे बैल

जालना - ‘महा पशुधन एक्‍स्पो-२०१९’ या राष्ट्रीय पशूप्रदर्शनात सहभागी झालेला तब्बल २१ कोटींचा ‘सुलतान’ रेडा.
जालना - ‘महा पशुधन एक्‍स्पो-२०१९’ या राष्ट्रीय पशूप्रदर्शनात सहभागी झालेला तब्बल २१ कोटींचा ‘सुलतान’ रेडा.

जालना - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर शनिवारी (ता. २) तीनदिवसीय ‘महा पशुधन एक्‍स्पो’ या राष्ट्रीय पशुप्रदर्शनाला सुरवात झाली आहे. महागड्या रेड्यांसह देशभरातील विविध जातींचे प्राणी या प्रदर्शनात दाखल झाले आहेत.  

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. या वेळी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजेश टोपे यांची उपस्थिती होती. 

या प्राण्यांचे आकर्षण  
हरियानातील सोळाशे किलो वजनाचा व २१ कोटी रुपये किमतीचा ‘सुलतान’ रेडा या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. हरियानातील साडेनऊ कोटींचा ‘युवराज’ नावाचा रेडाही प्रदर्शनात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com