महाबॅंकेचे पुण्याचे पथक उदगीरला दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

उदगीर : नोटाबंदीनंतर व्यापाऱ्याला सुमारे अठरा लाख रुपये बदलून दिल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे पुण्याचे पथक गुरुवारी उदगीरमध्ये दाखल झाले आहे. या पथकाने विशेष लेखापरीक्षणाला सुरवात झाली असून, या पथकाच्या अहवालानंतर बॅंकेतील चार कर्मचाऱ्यांनी अठरा लाख रुपये बदलून कोणाला दिले याची माहिती उघड होणार आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर येथील महाराष्ट्र बॅंकेतून एका व्यापाऱ्यास हजार व पाचशेच्या बंद झालेल्या नोटा घेऊन त्याबदल्यात शंभर रुपयाच्या व नव्या दोन हजारांच्या जवळपास सतरा ते अठरा लाख रुपयांच्या नोटा दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सहायक व्यवस्थापक विकास कदम, लेखापाल शिवरत्न आघाव, रियाज कासार व नरसाबाई मुंडे यांच्यावर बॅंकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने सोमवारी (ता. 21) निलंबनाची कारवाई केली होती. याची चौकशी करण्यासाठी महाबॅंकेचे पुण्याचे विशेष पथक सकाळी दाखल झाले. त्यांनी दुपारपासूनच विशेष लेखापरीक्षणाला सुरवात केली असून, त्यांचे काम किती दिवस चालणार हे मात्र कळू शकले नाही.

Web Title: mahabank team to udgir