'रासप'ला हव्यात 57 जागा : जानकर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) 57 जागांची मागणी करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी (ता. 19) दिली. 

हिंगोली - आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) 57 जागांची मागणी करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी (ता. 19) दिली. 

येथील शासकीय विश्रामगृहात जानकर यांनी "सकाळ'शी संवाद साधला. जानकर म्हणाले, "राज्यात चांदा ते बांदापर्यंत रासपची मोठी ताकद निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीत आमचे सहा जिल्हा परिषद सदस्य असताना विधानसभेच्या चार जागा दिल्या होत्या. मात्र आता रासपचे 98 जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे या वेळी विधानसभा निवडणुकीत आम्ही 57 जागांची मागणी करणार आहोत. मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक विधानसभेची जागा रासपला सोडवून घेण्याबाबत आग्रह असणार आहे. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा रासप घटकपक्ष आहे. आतापर्यंत जागावाटपासंदर्भात भाजप व शिवसेनेसोबत दोन बैठका झाल्या आहेत. काही दिवसांत तिसरी बैठक होणार आहे. ज्या ठिकाणी पक्षाची ताकद मोठी आहे, त्या ठिकाणच्या जागा रासपला सोडण्यासाठी आम्ही आग्रही असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahadev Jankar demand fifty seven seat for Assembly elections