'महाजनको'चा निकाल पोलिस तपासाच्या फेऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

औरंगाबाद - 'महाजनको'च्या परीक्षा होऊन पाच महिने उलटले तरीही निकाल लागला नाही. या पेपर फुटी प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असल्याने तो पूर्ण होत नाही तोवर निकाल घोषित करणार नाही, अशी भूमिका महाजनकोने घेतली आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीतर्फे (महाजनको) मानव संसाधन व लेखा अधिकाऱ्यांच्या तब्बल 107 पदांसाठी 12 नोव्हेंबरला राज्यभर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान औरंगाबादला जयभवानीनगर येथील परीक्षा केंद्रात डिजिटल कॉपी आढळून आली होती. परीक्षागृहात परीक्षार्थ्यांनी सीमकार्डचे डिव्हाईसपॅंटमध्ये लपवून ठेवले होते. शर्टच्या बटणाजवळ असलेल्या छुप्या कॅमेऱ्याद्वारे परीक्षार्थींनी प्रश्‍नपत्रिका स्कॅन केली. प्रश्‍नपत्रिका स्कॅन होताच ती सेट केलेल्या इमेलवर आपोआप सेंट झाली. त्यानंतर प्रश्‍नांचे गाईड, संच व इंटरनेटद्वारे उत्तरे शोधून बाहेर असलेल्या व्यक्तीने परीक्षार्थ्यांना सीमकार्ड असलेल्या डिव्हाईसवर संपर्क साधला, मायक्रोफोन, ब्लुटूथद्वारे उत्तरे ऐकून परीक्षार्थी परीक्षा देत असल्याचा प्रकार उघड झाला होता.
Web Title: mahajanako exam result police inquiry