Maratha Kranti Morcha : रास्ता रोको आंदोलनात रूग्णवाहिकेला दिली वाट

प्रशांत शेटे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

चाकुर (लातूर) - मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांतीदिनी गुरूवारी (ता. ९) पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये तालूक्यातील सर्व गावातील नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला, रस्त्यावर एकही वाहन नाही, दुकाने, शाळा, महाविद्यालय, बँका बंद असल्यामुळे सर्वत्र संचारबंदीसारखी परस्थिती निर्माण झाली आहे. मराठा समाजास कायदेशीर पध्दतीने आरक्षण देण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी ३० जूलै पासून येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु असून तालूक्यातील प्रत्येक गावातील  मराठा समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. 

महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर चाकूर, वडवळ नागनाथ, चापोली, नळेगाव, जानवळ, लातूररोड, शेळगाव, झरी, रोहिणा, अजनसोंडा, आष्टामोड, सुगाव येथे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. या गावातील कार्यकर्ते चाकूर व आष्टामोड येथील लातूर - नांदेड रस्त्यावर सुरु असलेल्या रास्तारोको आंदोलनात सहभागी झाले होते. शाळा, महाविद्यालयास सुट्टी देण्यात आली होती तसेच आंदोलनकर्त्यांनी बँकाही बंद केल्या होत्या. दुपार पर्यंत तालूक्यात कोठेही अनुचितप्रकार घडला नाही, उपविभागीय पोलिस अधिकारी बळीराम लंजीले, पोलिस निरीक्षक रामेश्वर तट, उपनिरीक्षक शेलैश बंकवाड, उपनिरीक्षक संतोष गित्ते यांच्यासह प्रत्येक गावात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

तीन अॅम्बुलन्सला करून दिला रस्तायेथील जून्या बसस्थानकाजवळ लातूर - नांदेड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन सुरु असताना अहमदपूरहून लातूरकडे रूग्णास घेऊन जात असलेल्या अम्बुलन्सला आंदोलनकर्त्यांनी तत्काळ रास्ता करून दिला. तसेच लातूरहून मृतदेह घेऊन जाणाऱ्या दोन अॅम्बुलन्सला ही आंदोलनकर्त्यांनी रस्ता दिला.

Web Title: maharahtrabandh maratha kranti morcha The road was stopped by the protesters